जिल्ह्यात १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा
By Admin | Updated: November 24, 2014 00:34 IST2014-11-24T00:13:56+5:302014-11-24T00:34:16+5:30
जालना : जिल्ह्यात सद्यस्थितीत १० गावे आणि ८ वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गरज पडेल तेथे मागणीनुसार टँकर पाठविण्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात येत आहे.

जिल्ह्यात १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा
जालना : जिल्ह्यात सद्यस्थितीत १० गावे आणि ८ वाड्यांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गरज पडेल तेथे मागणीनुसार टँकर पाठविण्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात येत आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात डिसेंबरपर्यंत तीव्र स्वरूपाची टंचाई नसल्याचे नमूद असले तरी डिसेंबरमध्ये काही गावांमध्ये टँकरची मागणी वाढणार असल्याचा अंदाज आहे. बदनापूर तालुक्यात ३ गावे व ३ वाड्या, अंबड ५ गावे व ३ वाड्या तर घनसावंगी तालुक्यात २ गावे व ४ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या टंचाईग्रस्त गावात टँकर पाठविण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे आहेत.
ज्या भागात विहिरींचे अधिग्रहण करणे आवश्यक आहे, तेथे अधिग्रहणाला प्राधान्य देण्यात येत आहे. १३ गावे आणि ६ वाड्यांसाठी १८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
यामध्ये बदनापूर ३ गावे व २ वाड्या, अंबड ५ गावे व ३ वाड्या त्याचप्रमाणे घनसांवगी तालुक्यात ५ गावे आणि ३ वाड्यांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)