पाणीपुरवठा योजना १९६ कोटींचीच

By Admin | Updated: April 15, 2016 01:46 IST2016-04-15T01:40:26+5:302016-04-15T01:46:06+5:30

परभणी : युआयडीएसएसएमटी पाणीपुरवठा योजनेची २००६-०७ च्या दरसुचीनुसार मूळ किंमत १०४ कोटी रुपये होती़ या योजनेची निविदा अंतीम करतेवेळेस

The water supply scheme is worth only 196 crore | पाणीपुरवठा योजना १९६ कोटींचीच

पाणीपुरवठा योजना १९६ कोटींचीच


परभणी : युआयडीएसएसएमटी पाणीपुरवठा योजनेची २००६-०७ च्या दरसुचीनुसार मूळ किंमत १०४ कोटी रुपये होती़ या योजनेची निविदा अंतीम करतेवेळेस २००९ ते २०११ या काळात दर सुचीतील फरकामुळे या योजनेच्या रकमेत वाढ होवून योजनेची किंमत १९६़२२ कोटी रुपयेच झाली असल्याचा खुलासा मनपा आयुक्त राहुल रेखावार यांनी केला आहे़
९ एप्रिल रोजी ‘लोकमत’ने ‘योजनेतील दिरंगाईमुळे ८२ कोटींचा भुर्दंड’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताच्या अनुषंगाने महापालिकेचे आयुक्त राहुल रेखावार यांनी ‘लोकमत’कडे खुलासा पाठविला आहे़ या संदर्भात पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, युआयडीएसएसएमटी पाणीपुरवठा योजनेची मूळ किंमत १०४ कोटी रुपये असली तरी २००६-०७ च्या दरसुचीनुसार ती मंजूर किंमत होती़ शासनाने २००८ मध्ये योजनेला मंजुरी दिली़ २००९ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू झाली़ निविदा अंतीम करेपर्यंत २००९ ते २०११ या काळात दरसुचीच्या फरकामुळे रकमेच्या किंमतीत वाढ होवून ती १९६़२२ कोटी झाली़ त्याप्रमाणे शासनाने मान्यता दिली व निधीही वितरित करण्यात आला आहे आणि या मंजूर रकमेच्या आधीन राहूनच कंत्राटदाराकडून कामे करून घेण्यात येत आहेत़ कोणत्याही प्रकारची दरवाढ किंवा वाढीव रक्कम अदा केली नाही़ त्यामुळे योजनेची किंमत २२२ कोटीपर्यंत गेली, असे म्हणणे चुकीचे आहे़ शासनाकडून मागणी केलेली १७ कोटी रुपयांची रक्कम दरसुचीतील फरकाची व मंजूर रक्कमेपैकी असल्याने या रकमेस वाढीव रक्कम म्हणता येणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे़ २०१३-१४ मधील लेखापरिक्षणात उपस्थित केलेल्या मुद्यांची पूर्तता करण्यात आली असून, करण्यात आलेल्या दोन भागांची मान्यता तत्कालीन आयुक्त व संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय यांच्याकडून घेण्यात आलेली आहे़ दोन्ही भागांच्या रकमेस शासनाने मान्यता दिली आहे़ हायड्रोलिक टेस्टिंगकरीता मनपाने कंत्राटदाराची रक्कम राखून ठेवलेली असून, हायड्रोलिक टेस्टिंग पूर्ण झाल्याशिवाय ही रक्कम अदा करण्यात येणार नाही़ त्यामुळे ही टेस्टिंग न करता कंत्राटदाराचे बिल अदा करण्यात आले, असे म्हणणे चुकीचे आहे़, असेही खुलाशात नमूद करण्यात आले आहे़
योजनेबाबत वेळोवेळी आवश्यक त्या तांत्रिक बदलाची परवानगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून घेतली आहे़ प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे़ त्यांच्या मार्गदर्शनानुसार, कामे केली जातात़ साहित्य खरेदी देखील अंदाजपत्रकानुसार, आयएसआय मानांकनानुसार असून, त्याची त्रयस्त शासकीय समितीकडून चाचणी करण्यात आली आहे़ जलशुद्धीकरण केंद्राची जागाही निश्चित केली असून, नवीन पाणीपुरवठा योजना लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न मनपा करीत आहे़, असेही आयुक्तांनी या खुलाशात स्पष्ट केले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The water supply scheme is worth only 196 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.