डिसेंबरपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा

By Admin | Updated: September 13, 2014 00:10 IST2014-09-12T23:57:32+5:302014-09-13T00:10:37+5:30

नांदेड : विष्णूपुरी प्र्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे नांदेडकरांना १५ सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला़

Water supply one day till December | डिसेंबरपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा

डिसेंबरपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा

नांदेड : विष्णूपुरी प्र्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे नांदेडकरांना १५ सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला़ शहराला डिसेंबर २०१४ पर्यंत एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे़
महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती उमेश पवळे यांनी मागील आठवड्यात झालेल्या स्थायी सभेत एक दिवसआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला़ त्यानंतर आयुक्तांनी १५ सप्टेंबरपासून शहराला एक दिवसाआड पाणी सोडण्याचे जाहीर केले आहे़ सणासुदीच्या काळात नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी डिसेंबर २०१४ पर्यंत एक दिवसआड पाणी सोडण्यात येणार आहे़ सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे़ पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे - विषम दिनांक १५ , १७, १९, २१ सप्टेंबर या प्रमाणे रेल्वे लाईनच्या दक्षिणेकडील भाग, वजिराबाद, गुरूद्वारा परिसर, इतवारा, गाडीपुरा, खुदबईनगर, होळी, चौफाळा, रंगारगल्ली, सिद्धनाथपुरी, गणिमपुरा, सिद्धार्थनगर, खडकपुरा, दुल्लेशाह रहेमाननगर, गोलचाळ, गंगाचाळ, पक्कीचाळ, सोमोश कॉलनी, मीलरोड, गोवर्धनघाट, देगावचाळ, चिखलवाडी, डॉक्टरलेन, गवळीपुरा, शिंधी कॉलनी, बाफनारोड, अबचलनगर, दशमेशनगर, महेबुबीयाकॉलनी, पाकिजानगर, एकबालनगर, मिल्लतनगर, गाडेगावरोड, छत्रपतीनगर जलकुंभावरील भाग, तरोडा खु़ भाग, शोभानगर, पौर्णिमानगर, हनुमानगड, व्हीआयपीरोड, गोकुळनगर, दत्तनगर,नवामोंढा व सिडको भाग़
सम दिनांक१६, १८, २०, २२ सप्टेंबर या प्रमाणे रेल्वे लाईनच्या उत्तरेकडील भाग, गणेशनगर, रामानंदनगर, विजयनगर, यशवंतनगर, राजनगर, कैलासनगर, निजामकॉलनी, अशोकनगर, आनंदनगर, श्यामनगर, हर्षनगर, शाहूनगर - बाबानगर, वसंतनगर, मगणपुरा, शिवाजीनगर, नईआबादी, विसावानगर, रविराजनगर, कल्याणनगर, सन्मित्रकॉलनी, प्रभातनगर, स्नेहनगर आदी़ (प्रतिनिधी)
विष्णूपुरी प्रकल्प शंभर टक्के भरले असले तरी पुढील पावसाळ्यापर्यंत या प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे़ यंदा अडीच महिने पावसाने हुलकावणी दिल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ८ दलघमी पाणी शिल्लक राहिले होते़ त्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती़ मात्र उशिरा झालेल्या पावसाने प्रकल्प पूर्णपणे भरले़ त्यामुळे हे पाणी टिकविण्यासाठी योग्य काळजी घेण्याची गरज आहे़ शहराला नियोजन करून पाणी सोडणे, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे, पाण्याचा अपव्यय थांबविणे, फुटलेले पाईपलाईन तात्काळ दुरूस्ती करणे, आदी कामांसाठी समिती स्थापन करावी, अशी मागणी येथील नागरिक नंदकुमार चालिकवार यांनी केली आहे़

Web Title: Water supply one day till December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.