पाणीपुरवठ्यास तासन्तास उशीर

By Admin | Updated: September 19, 2014 01:16 IST2014-09-19T00:22:57+5:302014-09-19T01:16:02+5:30

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आज कोलमडले.

Water supply delayed by hour | पाणीपुरवठ्यास तासन्तास उशीर

पाणीपुरवठ्यास तासन्तास उशीर

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आज कोलमडले. सकाळी ६ वाजता होणारा पाणीपुरवठा दुपारी ११ वा झाला. उशिरा का होईना, परंतु पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पाण्यासाठी अनेकांना कामावर जाण्यास उशीर झाला. १५ ते १७ सप्टेंबरपर्यंत शहराला निर्जळीचा सामना करावा लागला. त्यामुळे नागरिकांना महागड्या टँकर्सवर पाण्याची गरज भागवावी लागली. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेनंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला. आज ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होणार होता, त्या वसाहतींना चार तास उशिरा पाणी आले. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सुरू केलेल्या कॉल सेंटरने चुकीची माहिती दिल्यामुळे कोणत्या भागात कधी पाणी येणार हे नागरिकांना सांगताना नगरसेवकांची दमछाक झाली.
अनागोंदी कारभार
नगरसेवक प्रमोद राठोड म्हणाले, पाणीपुरवठा झाला. मात्र, चार तास उशिराने. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने जे कॉल सेंटर स्थापन केले आहेत. त्यांच्याकडे नगरसेवकांचे फोन नंबर्स चुकीचे आहेत.
विठ्ठलनगरचा नगरसेवक म्हणून राठोड यांना फोन करून पाणीपुरवठा उशिरा होणार असल्याचे कॉल सेंटरवरून सांगण्यात आले. मग एन-३, एन-४ ची माहिती त्यांनी कुणाला दिली, असा प्रश्न आहे. पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. पाणीपुरवठ्याच्या खाजगीकरणामुळे नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत, असा आरोप राठोड यांनी केला. तसेच प्रत्येक प्रभागनिहाय पाणीपुरवठा समिती गठीत करण्याची त्यांनी मागणी केली.

Web Title: Water supply delayed by hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.