९०० गावांत ७०१ टँकरने पाणीपुरवठा

By Admin | Updated: July 21, 2014 00:43 IST2014-07-21T00:39:21+5:302014-07-21T00:43:30+5:30

औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी विभागातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. पुरेशा पावसाअभावी दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होत आहे.

Water supply to 701 tankers in 9 00 villages | ९०० गावांत ७०१ टँकरने पाणीपुरवठा

९०० गावांत ७०१ टँकरने पाणीपुरवठा

औरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी विभागातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. पुरेशा पावसाअभावी दिवसेंदिवस पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होत आहे.
विभागातील दोन हजारांपेक्षा जास्त गावांना सध्या पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. यापैकी ८९० गावांना ७०१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
मराठवाड्यात जानेवारी महिन्यापासून पाणीटंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
१८७४ विहिरींचे अधिग्रहण
मराठवाड्यातील टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने अनेक ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. टंचाईग्रस्त गावांत जवळ एखाद्या विहिरीला पाणी असेल तर तेथेच लोकांना ती विहीर अधिग्रहित करून पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मराठवाड्यात १३९७ गावांमध्ये एकूण १८७४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४८२ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात ३७०, नांदेड जिल्ह्यात ३४७, औरंगाबाद जिल्ह्यात ३३०, जालना जिल्ह्यात १३१, लातूर जिल्ह्यात १५२, हिंगोली जिल्ह्यात ५२ आणि परभणी जिल्ह्यात १० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
जिल्हा टंचाईग्रस्त गावेटँकर
औरंगाबाद२३३३२७
जालना४०३५
परभणी००००
हिंगोली०२०२
नांदेड३८३०
बीड४८३२२२
लातूर१०१०
उस्मानाबाद८३७५
एकूण८८९७०१

Web Title: Water supply to 701 tankers in 9 00 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.