महिलांनीच सोडविला पाणीप्रश्न
By Admin | Updated: July 29, 2014 01:12 IST2014-07-28T23:41:48+5:302014-07-29T01:12:35+5:30
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील सेंदुरसना येथे ८ बोअरवेल घेऊन पाईपलाईनद्वारे विहिरीत पाणी सोडण्यात आले आहे.
महिलांनीच सोडविला पाणीप्रश्न
शिरडशहापूर : औंढा नागनाथ तालुक्यातील सेंदुरसना येथे ८ बोअरवेल घेऊन पाईपलाईनद्वारे विहिरीत पाणी सोडण्यात आले आहे. अशाप्रकारे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांनीच सोडविला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन टोपाजी विश्वनाथ आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अधिकारी संगीता भोंगाडे, चंदनसिंग राठोड, प्रकाश धाबे, विकास सुंसर, गंगाधर सूर्यतळ, मुंजाजी सूर्यतळ, राजू ढेंबरे आदींची उपस्थिती होती. यावेळी भोंगाडे म्हणाले की, महिलांनी जागरुक व्हावे, ग्रामसभेत आपल्या अडीअडचणी सांगून प्रश्न सोडवावेत. तसेच कम्युनिटी मॉडेल्सच्या अडअडचणीतून असे प्रश्न सोडवावे, बचत गटाच्या महिलांनी अनेक योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगण्यात आले. महिला आर्थिक विकास महामंडळद्वारा रोशनी लोकसंचालित साधन केंद्र व स्थापित महिला गावविकास समिती अंतर्गत तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत कम्युनिटी मॉडेल्सचा हा कार्यक्रम होता.
यावेळी महिला गावविकास समितीच्या रमाबाई ढोंबरे, मैनाबाई आहेर, कौशल्या देवकते, सविता सूर्यतळ तसेच बचत गटातील महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन छाया थोरात तर आभार प्रदर्शन संदेशकुमार ठोंबरे यांनी केले. (वार्ताहर)
सेंदुरसना येथे भर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होती
महिलांनाच टंचाईची झळ बसलेली असल्याने त्यांनी हा प्रश्न सोडविला आहे.