वाळूज परिसरात पाणीटंचाई

By Admin | Updated: July 23, 2014 00:40 IST2014-07-23T00:21:19+5:302014-07-23T00:40:59+5:30

वाळूज महानगर : पावसाने पाठ फिरविल्यामुळे तलाव कोरडे पडले आहेत. तलावात पाणी नसल्यामुळे पेयजल योजनाही कामाच्या राहिलेल्या नाहीत.

Water shortage in the sand area | वाळूज परिसरात पाणीटंचाई

वाळूज परिसरात पाणीटंचाई

वाळूज महानगर : पावसाने पाठ फिरविल्यामुळे तलाव कोरडे पडले आहेत. तलावात पाणी नसल्यामुळे पेयजल योजनाही कामाच्या राहिलेल्या नाहीत. नागरिकांना व मुक्या जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी एकही दमदार पाऊस झालेला नाही. भूगर्भातील पाणीपातळी खोल जात आहे. परिसरातील हातपंप, विहिरी व बोअरवेल्सने तळ गाठला आहे. तर काही विहिरी पूर्ण आटल्या
आहेत.
काही बोअरवेलचे पाणी कारखान्यांचे रसायनमिश्रित सांडपाणी पाझरल्यामुळे पिण्यायोग्य राहिलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्वस्वी एमआयडीसीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे.
नागरिक पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी एमआयडीसीच्या गळक्या जलवाहिनीचे वापरतात. काही ठिकाणी टँकरचालक राजकीय पुढारी किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या घराजवळ थांबवत असल्यामुळे गरीब नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाऊस न झाल्यामुळे गावांना पाणीपुरवठा करण्यासाठीची पेयजल योजनाही तलावात पाणी नसल्याने उपयोगाची राहिलेली नाही.
कारखान्यांचे पाणी
बंद करावे
औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी वापरले जाते. कारखान्यांपेक्षा नागरिकांना पाण्याची जास्त गरज आहे. प्रशासनाने दारू, बीअर कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून नागरिकांना ते द्यावे.
-प्रकाश जाधव, कामगार नेते
पाणी जपून वापरावे
पावसाअभावी जलसाठे आटले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल. त्यामुळे आहे ते पाणी नागरिकांनाी काटकसरीने वापरावे.
-सुनील काळे,
उपसरपंच , वडगाव कोल्हाटी
पर्यावरणाचे संतुलन गरजेचे
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी दीर्घायुषी झाडे लावण्याची गरज आहे. आज कोट्यवधी रुपये झाडे लावण्यावर खर्च केले जातात; पण त्यांची जोपासना होणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे पाऊस पडत नाही. दारू, बीअर कंपनीचे पाणी बंद करून ते नागरिकांना पिण्यासाठी द्यावे.
-सुरेश फुलारे, लघुउद्योजक

Web Title: Water shortage in the sand area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.