शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धरण उशाला,कोरड घशाला; औरंगाबादच्या पाणीटंचाईवर आज भाजपचा मोर्चा,१४ अटींवर परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 13:52 IST

पैठण गेट ते गुलमंडी मार्गे महात्मा फुले चौक मार्गे सांस्कृतिक मंडळ ते मनपा असा मोर्चा जाईल

औरंगाबाद : शहरात दर आठवड्याला होणारा पाणीपुरवठा १,६८० कोटी रुपयांच्या नवीन जलवाहिनी योजनेच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाविरोधात भाजप २३ मे रोजी सायंकाळी ४ वा. पैठणगेट ते महापालिकेपर्यंत मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. कराड म्हणाले, शहरात आठ-आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. १,६८० काेटींची पाणीपुरवठा योजना आ. अतुल सावे यांनी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मंजूर करून घेतली. परंतु महाविकास आघाडी सरकारने नव्याने अध्यादेश काढून योजनेचे स्वरूप बदलले. त्याला मनपा प्रशासकांनीदेखील होकार दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिथे योजनेचे भूमिपूजन केले त्या ठिकाणचे कामदेखील सुरू झालेले नाही. सतरा ठिकाणी जलकुंभाचे काम सुरू केले, एकही काम पूर्ण झाले नाही. औरंगाबाद ते पैठण या महामार्गावर जलवाहिनीचे अलायनमेंट कसे असेल, याची माहितीदेखील समोर आलेली नाही. असे असेल तर ही जलवाहिनी१० वर्षे होणार नाही. या कारभाराविरोधात २३ मे रोजी मोर्चा काढून सरकारला जागे करण्यात येणार आहे. शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले, सरकारने मोर्चाचा मार्ग बदलण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव आणला. १४ अटींसह परवानगी दिली आहे. पैठण गेट ते गुलमंडी मार्गे महात्मा फुले चौक मार्गे सांस्कृतिक मंडळ ते मनपा असा मोर्चा जाईल, तेथे सभेने समारोप होईल. या मोर्चाची शिवसेनेने धास्ती घेतल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी राजू शिंदे, अनिल मकरिये, भगवान घडमोडे यांची उपस्थिती होती.

१२ टक्के झाले आहे योजनेचे कामआ. अतुल सावे यांनी आरोप केला, ऑक्टोबर २०२० मध्ये योजनेचे काम सुरू झाले. ३ वर्षांत योजनेचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. आजवरच्या काळात फक्त १२ टक्के काम झाले आहे. आधी जलवाहिनी पैठण ते औरंगाबाद टाकणे गरजेचे होते, परंतु ते काम बाजूस ठेवून जलकुंभ बांधण्यास प्राधान्य दिल्याने ही योजना समांतरच्या दिशेने जाईल, अशी भीती आहे. योजना २०८० कोटींवर गेली असून साडेचार कि.मी. जलवाहिनीचे काम झाल्याचा दावा त्यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाwater scarcityपाणी टंचाई