शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, एमआयएममुळेच शहरात पाणीटंचाई,समांतरच्या योजनेचे वाटोळे त्यांनीच केले: चंद्रकांत खैरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 11:45 IST

समांतरच्या योजनेत भ्रष्टाचार केल्याचे दाखवून द्या, मी राजकारणातून संन्यास घेईन

औरंगाबाद : केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना समांतर जलवाहिनी मंजूर केली. मात्र, भाजप आणि एमआयएममुळेच त्या योजनेचे वाटोळे झाले. शहरातील पाणीटंचाईला भाजप आणि एमआयएम जबाबदार असल्याची टीका माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

समांतरच्या योजनेत भ्रष्टाचार केल्याचे दाखवून द्या, मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हानही त्यांनी दिले. शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती सुधारत आहे. हे भाजप आणि एमआयएमला देखवत नाही, शिवसेनेला श्रेय मिळू नये, यासाठी वाटेल ते आरोप करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील भाजपच्या काही नगरसेवकांनी पाणीटंचाईवरून आंदोलन केले होते. मुंबई आणि औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला बदनाम करण्याचा यांचा डाव आहे. शहरात रस्ते, ड्रेनेज, पथदिव्यांची कामे झाली आहेत. पाणीपुरवठा योजनेचे काम देखील सुरू आहे. जलवाहिन्या मुद्दाम चोकअप करणे, जलकुंभांवर आंदोलन करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे सगळे शिवसेनेला बदनाम करण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, कला ओझा, सुनीता आऊलवार, सुनीता देव यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने मोर्चा काढावा का ?मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाने पाणीपुरवठ्यावर मोर्चा काढावा काय, असा सवाल खैरेंनी केला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सभेला सभेतून उत्तर देण्याची गरज काय होती? विधानसभेत बोलता आले असते. राज्य सरकारने शहराला भरपूर काही दिले आहे. मागच्या सरकारच्या काळात तुकडे - तुकडे करून निधी दिला. मात्र, जाहिराती मोठमोठ्या केल्याची टीकाही खैरे यांनी केली.

कराड, जलील, केणेकर यांच्यावर टीकाखा. इम्तियाज जलील यांना काहीही काम नाही. त्यांनी शहरातील कोणत्या भागात फिरून पाणीटंचाईचा आढावा घेत उपाययोजना केल्या, ते दाखवावे. लोकांच्या काय समस्या आहेत, हे त्यांना माहिती तरी आहे का, असे खैरे म्हणाले. मुस्लिम समाजाचे लोक माझ्याकडे समस्या सोडविण्यासाठी येतात. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे मनपात महापौर असताना त्यांनी काय कामे केली, हे मला माहीत आहे. तसेच भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर ‘टीनपाट’ असून त्यांचे सगळे ‘धंदे’ बाहेर काढण्याचा इशारा खैरे यांनी दिला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेनाwater scarcityपाणी टंचाई