शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी शहरात जलदिंडीतून पाणी बचतीचा संदेश

By admin | Updated: March 23, 2016 00:23 IST

परभणी : ‘जल है तो कल है’ चा नारा देत शहरातून राष्ट्रीय जल दिनाच्यानिमित्ताने जलदिंडी काढण्यात आली़

परभणी : ‘जल है तो कल है’ चा नारा देत शहरातून राष्ट्रीय जल दिनाच्यानिमित्ताने जलदिंडी काढण्यात आली़ शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी दिंडीत सहभागी होवून पाणी बचतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम केले़ राष्ट्रीय जलदिनाच्या निमित्ताने २२ मार्च रोजी परभणी शहरातून जलदिंडी काढण्यात आली़ जलमित्र संघटनेच्या वतीने ही दिंडी काढण्यात आली होती़ शहरातील शिवाजी चौक येथून मंगळवारी सकाळी ८ वाजता दिंडीस सुरुवात झाली़ महापौर संगीता वडकर, उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त राहुल रेखावार, जलमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ़ राजगोपाल कालानी, उपायुक्त रणजीत पाटील, ह़भ़प़ अच्युत महाराज दस्तापूरकर, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, मनपाच्या विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे यांच्या हस्ते दिंडीस हिरवा झेंडा दाखविण्यात आला़ ही दिंडी शिवाजी चौक येथून गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभुजा देवी मंदिर, आऱआऱ टॉवर, नारायण चाळ, स्टेशन रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली़ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिंडीचा समारोप करण्यात आला़ समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी महिवाल यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा देऊन पाण्याचे महत्त्व विशद केले़ आयुक्त रेखावार, महापौर वडकर, उपमहापौर वाघमारे, राजगोपाल कालानी यांनी मनोगत व्यक्त केले़ सुनील तुरूकमाने यांनी सभेच्या समारोपप्रसंगी सूत्रसंचालन केले़ जलदिंडीमध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला, विद्यार्थी, युवक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता़ प्रत्येकाच्या हातामध्ये पाण्याचे महत्त्व विशद करणारे फलक होते़ जलदिनाच्यानिमित्ताने पाण्याचे महत्त्व सांगणारे घोषवाक्य उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते़ (प्रतिनिधी)