परभणी शहरात जलदिंडीतून पाणी बचतीचा संदेश
By Admin | Updated: March 23, 2016 00:23 IST2016-03-23T00:21:25+5:302016-03-23T00:23:23+5:30
परभणी : ‘जल है तो कल है’ चा नारा देत शहरातून राष्ट्रीय जल दिनाच्यानिमित्ताने जलदिंडी काढण्यात आली़

परभणी शहरात जलदिंडीतून पाणी बचतीचा संदेश
परभणी : ‘जल है तो कल है’ चा नारा देत शहरातून राष्ट्रीय जल दिनाच्यानिमित्ताने जलदिंडी काढण्यात आली़ शहरातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी दिंडीत सहभागी होवून पाणी बचतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्याचे काम केले़
राष्ट्रीय जलदिनाच्या निमित्ताने २२ मार्च रोजी परभणी शहरातून जलदिंडी काढण्यात आली़ जलमित्र संघटनेच्या वतीने ही दिंडी काढण्यात आली होती़ शहरातील शिवाजी चौक येथून मंगळवारी सकाळी ८ वाजता दिंडीस सुरुवात झाली़ महापौर संगीता वडकर, उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त राहुल रेखावार, जलमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ़ राजगोपाल कालानी, उपायुक्त रणजीत पाटील, ह़भ़प़ अच्युत महाराज दस्तापूरकर, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, मनपाच्या विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे यांच्या हस्ते दिंडीस हिरवा झेंडा दाखविण्यात आला़ ही दिंडी शिवाजी चौक येथून गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभुजा देवी मंदिर, आऱआऱ टॉवर, नारायण चाळ, स्टेशन रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली़ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिंडीचा समारोप करण्यात आला़ समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी महिवाल यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा देऊन पाण्याचे महत्त्व विशद केले़ आयुक्त रेखावार, महापौर वडकर, उपमहापौर वाघमारे, राजगोपाल कालानी यांनी मनोगत व्यक्त केले़ सुनील तुरूकमाने यांनी सभेच्या समारोपप्रसंगी सूत्रसंचालन केले़ जलदिंडीमध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला, विद्यार्थी, युवक यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता़ प्रत्येकाच्या हातामध्ये पाण्याचे महत्त्व विशद करणारे फलक होते़ जलदिनाच्यानिमित्ताने पाण्याचे महत्त्व सांगणारे घोषवाक्य उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते़ (प्रतिनिधी)