येलदरी धरणातून सोडले पाणी

By Admin | Updated: March 27, 2016 23:57 IST2016-03-27T23:52:48+5:302016-03-27T23:57:29+5:30

येलदरी : परभणी शहरासाठी राखीव ठेवलेले पाणी २७ मार्च रोजी येलदरी धरणातून सोडण्यात आले़

Water released from Yeladri dam | येलदरी धरणातून सोडले पाणी

येलदरी धरणातून सोडले पाणी

येलदरी : परभणी शहरासाठी राखीव ठेवलेले पाणी २७ मार्च रोजी येलदरी धरणातून सोडण्यात आले़
रविवारी सायंकाळी वीजनिर्मितीद्वारे येलदरी धरणातील पाणी परभणीसाठी राहटी बंधाऱ्याकडे सोडण्यात आले आहे़ सध्या येलदरी धरणात ५़८० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ मागील काही दिवसांपूर्वी मनपाने जिल्हा प्रशासनाकडे शहराचा राखीव पाणीसाठा येलदरीतून सोडावा, अशी मागणी पत्राद्वारे कळविली होती़ त्यानुसार पूर्णा पाटबंधारे विभागाने सोडलेले पाणी सिद्धेश्वरमार्गे राहटीत येणार आहे़ त्यामुळे काही महिन्यांसाठी पाणीप्रश्न मिटणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Water released from Yeladri dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.