शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

माजलगाव प्रकल्पासाठी जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले; विसर्गाची शक्यता अंधुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 20:23 IST

पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाला असून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आल्याने आज दिवसभर जायकवाडी धरणातील आवक कमी होत असल्याचे दिसून आले.

पैठण (औरंगाबाद) : जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव प्रकल्पासाठी बुधवारी सकाळी अकरा वाजेस ३०० क्युसेक्स क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. माजलगाव प्रकल्पासाठी २९९.४२ दलघमी पाण्याचे जायकवाडी धरणात आरक्षण असून याप्रमाणे पाणी सोडण्यात येईल असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. 

जायकवाडी धरणाचा जलसाठा ८१% पेक्षा जास्त झाला असून ७५% विश्वासहर्तेच्या प्रचलन आराखड्यानुसार धरणातील जलसाठा ७९.११% पर्यंत कमी करावा लागणार आहे. दरम्यान मंगळवारी पहिल्या टप्प्यात जायकवाडीचा जलविद्युत प्रकल सुरू करून त्याद्वारे गोदावरी पात्रात १५८९ क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला.  दरम्यान जायकवाडी प्रकल्पातील टप्पा दोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजलगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने आज रोजी धरणाचा जलसाठा फक्त ३८.९७% एवढाच आहे. जायकवाडी धरणात माजलगावसाठी पाण्याचे आरक्षण असल्याने कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, शाखा अभियंता विजय काकडे, गणेश खराडकर आदींनी उजव्या कालव्याचे दरवाजे वर करून ३०० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आला. थेटपर्यंत कालव्याची चाचणी झाल्यानंतर कालव्यातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. 

जायकवाडी धरणाच्या सांडव्यावरून विसर्गाची शक्यता मावळली... पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाला असून नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आल्याने आज दिवसभर जायकवाडी धरणातील आवक कमी होत असल्याचे दिसून आले. त्यातच १८८९ क्युसेक्स  विसर्ग धरणातून होत असल्याने धरणाच्या सांडव्यावरून विसर्गाची शक्यता तूर्त मावळली असून धरणात जास्तीत जास्त जलसाठा ठेवण्याचा जायकवाडी प्रशासनाच्या धोरणा नुसार आता जलसाठा ९०% झाल्यानंतर विसर्ग करण्याचा निर्णय होईल असे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणMajalgaon Damमाजलगाव धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी