जलशुद्धीकरण केंद्रांची सुरक्षा वाऱ्यावर
By Admin | Updated: August 18, 2016 00:56 IST2016-08-18T00:47:52+5:302016-08-18T00:56:33+5:30
लातूर : लातूर शहरातील साई रोड परिसर, उदगीर, देवणी, हाळी हंडरगुळी, शिरुर अनंतपाळ, औसा, चाकूर, अहमदपूर येथील जलशुध्दीकरण

जलशुद्धीकरण केंद्रांची सुरक्षा वाऱ्यावर
लातूर : लातूर शहरातील साई रोड परिसर, उदगीर, देवणी, हाळी हंडरगुळी, शिरुर अनंतपाळ, औसा, चाकूर, अहमदपूर येथील जलशुध्दीकरण केंद्राचे लोकमत चमूने बुधवारी केलेल्या स्टींगमधून सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, या जलशुध्दीकरण केंद्रात कोणीही घुसले तरी, तेथील सुरक्षा रक्षकाने साधे हटकण्याची तसदी घेतली नसल्याचे स्टींगमधून उघड झाले.
औसा तालुक्यात तीन ठिकाणी जलशुद्धीकरणाची सोय आहे. उटी (बु.), आलमला व औसा येथे हे केंद्र आहेत. मात्र त्या ठिकाणी सुरक्षेचा अभाव असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशननंतर समोर आले आहे. उदगीर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे दोन जलशुद्धीकरण केंद्र अस्तित्वात आहेत. या दोन्ही ठिकाणी बुधवारी ‘लोकमत चमू’ने भेट दिली असता कर्मचाऱ्यांचा पहारा दिसून आला. तर हाळी हंडरगुळी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी उभारण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र वाऱ्यावरच असल्याचे दिसून आले. अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर सुरक्षा रक्षक नसल्यामुळे इथलीही सुरक्षा वाऱ्यावरच होती. (प्रतिनिधी)