जलशुद्धीकरण योजना १७ वर्षांपासून रखडली
By Admin | Updated: September 12, 2014 00:07 IST2014-09-11T23:45:45+5:302014-09-12T00:07:25+5:30
धर्माबाद : शहराला एक दिवसाआड पाणी मिळत असले तरीही ते गढूळ, दुर्गंधी पाणीपुरवठा होत असल्याने धर्माबादकरांचे आरोग्य धोक्यात येत आहे़

जलशुद्धीकरण योजना १७ वर्षांपासून रखडली
धर्माबाद : शहराला एक दिवसाआड पाणी मिळत असले तरीही ते गढूळ, दुर्गंधी पाणीपुरवठा होत असल्याने धर्माबादकरांचे आरोग्य धोक्यात येत आहे़ येथील जलशुद्धीकरण योजना १७ वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत असून नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे़
इळेगाव गोदावरी नदीपात्रातून धर्माबाद शहराला पाणीपुरवठा होत असून येथील रत्नाळी, बाळापूर व धर्माबाद शहराची लोकसंख्या ४० हजाराच्या वर आहे़ सध्या गोदावरी पात्रात पाणी कमी असल्याने एक दिवसाआड पाणी मिळत आहे़ पण हे पाणी गढूळ, दुर्गंधीयुक्त असल्याने पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्यांचे आरोग्य धोकयात येत आहे़ ज्यांच्याकडे पैसा आहे ते नागरिक फिल्टरचे पाणी वापरतात, परंतु जे गरीब नागरिक आहेत ते गढूळ पाणी पिवून आपली तहान भागवत आहेत़ नगरपालिकेने ८०० रुपयांऐवजी १२०० रुपये नळपट्टी लावून जनतेला गढूळ पाणी देत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे़ जलशुद्धीकरण योजना १७ वर्षापासून रेंगाळली आहे़ ही योजना चालू केली तर जनतेला शुद्ध पाणी मिळेल़ (वार्ताहर)