शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पाणी खाजगीकरण; नागरिकांचा उद्रेक

By admin | Updated: October 7, 2014 00:44 IST

औरंगाबाद : महापालिकेने पाणीपुरवठा यंत्रणेचे खाजगीकरण करून एक महिना उलटत नाही तोच उद्रेक होण्यास सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद : महापालिकेने पाणीपुरवठा यंत्रणेचे खाजगीकरण करून एक महिना उलटत नाही तोच उद्रेक होण्यास सुरुवात झाली आहे. प्रियदर्शिनीनगर, इंदिरानगर या वॉर्डात औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने नेमलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी चांगलाच धडा शिकविला. मागील आठवड्यापासून त्या भागात पाणीपुरवठा झाला नसल्यामुळे नगरसेवक प्रल्हाद निमगावकर यांनी मनपा आणि कंपनीच्या कर्मचारी, अभियंत्यांना संपर्क केला. मात्र, कुणीही प्रतिसाद दिला नाही. सणासुदीचे दिवस असताना प्रभागात पाणीपुरवठा झाला नसल्यामुळे नगरसेवक निमगावकर यांच्याकडे शेकडो महिला हेलपाटे मारीत होत्या. आज सकाळी पाणीपुरवठा झाला नाही म्हणून महिलांनी नगरसेवकाचे घर गाठले. निमगावकर यांनी मनपा आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठ्याप्रकरणी विचारणा केली. मनपा अभियंत्यांनी कंपनीकडे बोट दाखविले, तर कंपनीच्या अभियंत्यांनी त्यांना काहीही सांगितले नाही. वॉर्डात उपस्थित लाईनमन व इतर कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठ्याप्रकरणी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त महिला आणि नगरसेवकांनी त्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यात त्या कर्मचाऱ्याचा मोबाईल खाली पडला. त्या कर्मचाऱ्यांनी जलवाहिनीच्या चावीने तो मोबाईल स्वत:च फोडला आणि नागरिकांनाच धमकी सत्र सुरू केले. १ तारखेपासून आजपर्यंत दोन दिवस ५-५ तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे औरंगाबादकरांना सणासुदीच्या आणि निवडणुकीच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागली. ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेपासून ढोरकीन बुस्टर पंपाचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे ६ आॅक्टोबर रोजी कुठे कमी दाबाने, तर कुठे उशिरा पाणीपुरवठा झाला, तर काही भागांमध्ये पाणीपुरवठाच झालाच नाही. पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेचे खाजगीकरण करण्याची मनपाला गरजच नव्हती. जलवाहिनीचे काम करून घेतले असते, तर काय बिघडले असते.मी कुणालाही मारहाण केलेली नाही. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:च मोबाईल फोडला.