शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात पाण्याचा खेळ;९ दिवसांपासून बंद जलवाहिनी सुरू अन् ११ तासानंतर फुटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:10 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा खेळ, २० एमएलडी पाण्याचा तुटवडा

छत्रपती संभाजीनगर : शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा, अशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (मजीप्रा) अजिबात इच्छा नाही. त्यांनीच टाकलेली ९०० मिमी. व्यासाची जलवाहिनी मागील नऊ दिवसांपासून बंद होती. सोमवारी रात्री ११:०० वाजता ती कशीबशी सुरू झाली. मंगळवारी सकाळी ११:०० वाजता फारोळा फाट्याजवळच ती पुन्हा फुटली. त्यामुळे जलवाहिनीतून येणारे २० एमएलडी अतिरिक्त पाणी बंद झाले. विशेष बाब म्हणजे मजीप्राने दुरुस्तीचे कामही सुरू केले नाही.

शहराला उन्हाळ्यात अतिरिक्त ७५ एमएलडी पाणी मिळावे, यासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च करून ९०० मिमी. व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकली. जलवाहिनीतून फक्त २० एमएलडी पाणी काही महिन्यांपासून येत आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याला यामुळे थोडासा आधार मिळतो. २२ मार्च रोजी फारोळा फाटा येथे ९०० मिमी. व्यासाच्या जलवाहिनीच्या बाजूलाच २५०० मिमी. व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. या कामामुळे ९०० मिमी. जलवाहिनीचे काही पाइप निखळले होते. दुरुस्तीसाठी मजीप्राने तब्बल नऊ दिवस लावले. शहरात भयंकर पाणीप्रश्न असताना जलवाहिनी दुरुस्त करून दिली नाही. मनपाच्या प्रचंड रेट्यानंतर सोमवारी रात्री ११:०० वाजता जलवाहिनी सुरू झाली. सकाळी ११:०० वाजता ती फारोळा फाट्यापासून १०० मीटर अंतरावर परत २५०० मिमी. व्यासाचा पाइप टाकताना फुटली.

कंत्राटदाराचा निष्काळजीपणा२५०० मिमी. व्यासाची जलवाहिनी टाकताना ९०० मिमी. व्यासाच्या जलवाहिनीला सिमेंटचा सहारा दिलेला होता. हा टेकू जेसीबीच्या मदतीने काढण्यात आला. त्यामुळे जलवाहिनीचे जॉइंट निखळले. कंत्राटदाराचा हा निष्काळजीपणा असल्याचा आरोप मनपाने केला.

पाणीपुरवठा विस्कळीत करू नकामजीप्रा शहराला वाढीव पाणी देण्याचे आश्वासन देऊनही पाणी देऊ शकले नाही. शहराला सध्या ७००, ९०० आणि १,२०० मिमी. व्यासाच्या जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा होत आहे. नवीन २५०० मिमी. व्यासाची जलवाहिनी टाकताना पाणीपुरवठा सुरू असलेल्या जलवाहिन्यांना तरी बंद पाडू नका, अशी विनंती मनपाने केली आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणी