पाणी योजनेचे अंदाजपत्रक मंजूर
By Admin | Updated: December 23, 2015 23:47 IST2015-12-23T23:20:45+5:302015-12-23T23:47:11+5:30
उस्मानाबाद : तालुक्यातील चव्हाणवाडी येथील पुनर्सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेस २२ डिसेंबर रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असून,

पाणी योजनेचे अंदाजपत्रक मंजूर
उस्मानाबाद : तालुक्यातील चव्हाणवाडी येथील पुनर्सुधारित नळ पाणीपुरवठा योजनेस २२ डिसेंबर रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यामुळे गावचा पाणीप्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. विशेष म्हणजे या योजनेसाठी दुसऱ्यांदा ही रक्कम वाढवून देण्यात आली आहे.
चव्हाणवाडी पाणी पुरवठा योजनेसाठी पूर्वी ८ लाख दहा हजार रुपये ढोबळ खर्चाच्या अंदाजपत्रकास जुलै २००७ च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. परंतु, काही कारणांमुळे योजनेच्या खर्चात वाढ झाल्याने सन २००७ मध्ये २३.४७ लक्ष रुपये एवढ्या सुधारित किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर दरसुचितील फरक, जादा दराची निविदा स्वीकारणे तसेच काही उपांगाच्या खर्चात वाढ झाल्याने सदर योजना ४५.२९ लक्ष एवढी पुनर्सुधारित करावी लागली. पुनर्सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या वित्त विभाग, नियोजन विभाग व पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातील तसेच क्षेत्रिय स्तरावरील महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या अधिकाऱ्यांच्या छोट्या गटाने २० जून २०१४ रोजीच्या बैठकीत सदर योजनेस पुनर्सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर ४५ लाख २९ हजार रुपये किंमतीच्या या पुनर्सुधारित अंदाजपत्रकास २२ डिसेंबर रोजी मान्यता देण्यात आली.