पाणवठ्यांनाच पाण्याची गरज
By Admin | Updated: February 6, 2017 23:48 IST2017-02-06T23:45:07+5:302017-02-06T23:48:39+5:30
जालना : जालना शहराजवळच वनविभागाने पाणवठे तयार केले आहेत. परंतु या पाणवठ्यांमध्ये पाणी नसल्याने वन्य प्राण्यांची भटकंती होत आहे.

पाणवठ्यांनाच पाण्याची गरज
जालना : जालना शहराजवळच असलेल्या वनविभागाने पाणवठे तयार केले आहेत. परंतु या पाणवठ्यांमध्ये पाणी नसल्याने वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. थंडीची लाट कमी होऊन सकाळपासून उन्हाचा चटका वाढत आहे.
जालना शहराजवळ असलेल्या वनपरिक्षेत्रात अनेक वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. कडक उन्हाळ्यात त्यांची तहान भागावी, त्यांना पाण्यासाठी भटकावे लागू नये म्हणून पाणवठे तयार करण्यात आले आहे. परंतु सध्या या पाणवठ्यात पाणी नसल्याने व उन्हाचा कडाका वाढत असल्याने वन्य प्राण्यांचंी भटकंती वढत आहे. वन विभागाने या पाणवठ्यात पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक तसेच वन्यप्रेमींतून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)