पाणीपातळी अडीच मीटरने घटली

By Admin | Updated: May 6, 2015 00:30 IST2015-05-06T00:23:32+5:302015-05-06T00:30:21+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळीमध्ये २.५५ मीटरची घट झाली आहे.

Water level decreases by two and a half meters | पाणीपातळी अडीच मीटरने घटली

पाणीपातळी अडीच मीटरने घटली


लातूर : लातूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळीमध्ये २.५५ मीटरची घट झाली आहे.
लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात १५, औसा-१५, चाकूर-७, लातूर-१८, निलंगा-१७, शिरूर अनंतपाळ-५, रेणापूर-११, उदगीर-९, देवणी तालुक्यात ८ अशा एकूण १०९ विहिरींचे निरीक्षण करून पाणीपातळीचे प्रमाण मोजले जाते. मागील पाच वर्षांतील जानेवारीमधील सरासरी पाणीपातळी अहमदपूर-७.७४ मीटर, औसा-२.२१, चाकूर-७.३३, लातूर-७.६२, निलंगा-९.३३, शिरूर अनंतपाळ-९.२०, रेणापूर-७.४८, उदगीर-७.६७, जळकोट-९.७३, देवणी-५.४४ या प्रमाणात लातूर जिल्ह्यातील पाणीपातळीची सरासरी ८.१८ मीटरवर गेली आहे.
मागील पाच वर्षांच्या तुलनेत अहमदपूर तालुक्यातून -२.२७, औसा -२.९८, लातूर -२.२३, निलंगा -२.५१, शिरूर अनंतपाळ -२.९२, रेणापूर -२.३०, उदगीर -२.१४, जळकोट -४.२८, देवणी -१.५९ अशा एकूण २.५५ मीटरने पाणीपातळीत घट झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Water level decreases by two and a half meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.