चिकलठाणा परिसरात जलवाहिनीला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:31 IST2020-12-17T04:31:12+5:302020-12-17T04:31:12+5:30
------- शहानूरमिया दर्गा रस्त्यावरील दुभाजकातील डीपी उघड्याच औरंगाबाद : दूध डेअरी चौक ते शहानूरमिया दर्गा चौक रस्त्यावरील दुभाजकातील डीपींचे ...

चिकलठाणा परिसरात जलवाहिनीला गळती
-------
शहानूरमिया दर्गा रस्त्यावरील दुभाजकातील डीपी उघड्याच
औरंगाबाद : दूध डेअरी चौक ते शहानूरमिया दर्गा चौक रस्त्यावरील दुभाजकातील डीपींचे दरवाजे उघडेच आहे. अनेक पादचारी थेट दुभाजकावर चढून डीपींजवळून रस्ता ओलांडतात. त्यातून अपघाताचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे डीपींचे दरवाजे लावण्याची मागणी होत आहे.
--------
सहकारनगर चौकातील रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात
औरंगाबाद : सहकारनगर परिसरातील चौकातील रस्त्याला सध्या खड्ड्यांचा विळखा पडला आहे. चारही बाजूंनी येणाऱ्या वाहनधारकांना चौकातून ये-जा करताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चौकातील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.
------------
नाल्याच्या स्वच्छतेनंतर ढापे लावण्याकडे दुर्लक्ष
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील नाल्याची स्वच्छता करून गाळ काढण्यात आला आहे. परंतु हा गाळ याठिकाणी तसाच पडून आहे. तसेच नाल्याचे ढापे लावण्याकडेही दुर्लक्ष आहे. मनपाने लक्ष देऊन गाळ उचलण्याची आणि ढापा लावण्याची मागणी होत आहे.
---------
रस्त्याचे काम गतीने करण्याची मागणी
औरंगाबाद : उस्मानपुरा ते शहानूरमिया दर्गा चौकापर्यंत सिमेंट रस्ता आहे. परंतु ऐन चौकात खडीमय रस्ता आहे. त्यामुळे वाहनचालकांना ये-जा करताना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. चौकातील रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.