पाण्यासाठी जनजागर
By Admin | Updated: September 5, 2014 00:56 IST2014-09-05T00:38:26+5:302014-09-05T00:56:58+5:30
सितम सोनवणे , लातूर येथील दीपज्योती नगर व श्री नगरातील नमो नमो गणेश मंडळाच्या वतीने पाण्यासाठी जन जागर करण्यात येत आहे़ या अंतर्गत जल पुनर्भरण, पाणी आडवा पाणी जिरवा,

पाण्यासाठी जनजागर
सितम सोनवणे , लातूर
येथील दीपज्योती नगर व श्री नगरातील नमो नमो गणेश मंडळाच्या वतीने पाण्यासाठी जन जागर करण्यात येत आहे़ या अंतर्गत जल पुनर्भरण, पाणी आडवा पाणी जिरवा, नळाला तोट्या बसवा आणि पाण्याचे महत्व सांगणारा उपक्रम हाती घेतला आहे़ ‘पाण्यासाठी जागर’ या उपक्रमा अंतर्गत दररोज व्याख्यांनाचे अयोजन करण्यात येत आहे़
लातूर शहरातील एमआयडीसी परिसराच्या जवळच असलेल्या दिपज्योती नगर व श्री नगर भागास नेहमीच पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत़ तसेच लातूरकरांना ही पाणी टंचाई जाणवत आहे़ या टंचाईच्या काळात नमो नमो गणेश मंडळाच्या वतीने जन प्रबोधन करण्याचा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे़ या प्रबोधनामुळे जनतेस पाणी टंचाईच्या कारणांचा शोध व बोध करुन देण्यासाठी दररोज व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे़ शैलेश लाहोेटी, अॅड़ बळवंत जाधव, नगरसेविका वनिता काळे, नगरसेवक महादेव बरुरे, सपोउपनि़ वैजनाथ आडे यांनी पाणी आडवा पाणी जिरवा, पाणी वाचवा या या विषयावर मार्गदर्शन केले़
तसेच अनंत चथुर्थी पर्यत हा उपक्रम चालणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे़ हा उपक्रम गणेश उत्सवापर्यंतच नाहीतर पुर्ण वर्षभर राबवला जाणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे़ या अंतर्गत आपल्या परिसरात वृक्षारोपण, जल पुनर्भरण, नळाला तोट्या बसवणे या सर्व बाबींकडे मंडळाच्या वतीने लक्ष दिले जाणार आहे़ ज्यामुळे भविष्यात पाणी टंचाईची समस्या भेडसावणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे़ हे मंडळाचे पहिलेच वर्ष आहे़
दीपज्योती नगर, श्री नगर भागातील तरूणांनी यावर्षी गणेश मंडळाची स्थापना केली आहे़ पहिले वर्ष असल्याने जलपुनर्भरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले़ पाणी टंचाई ही नागरी समस्या असून याकडे काळजीपूर्वक बघावे लागणार आहे़ लातूर शहर हे गेल्या तीन वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सहन ्रकरीत आहे़ त्यामुळे शहरात जनजागर होणे गरजेचे आहे़