शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

video : पाणी पेटले; शेतकऱ्यांनी हल्लाबोल करत अधिकाऱ्याला कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 14:53 IST

 गोदावरी महामंडळ कार्यालयात हक्काच्या पाण्यासाठी ठिय्या आंदोलन

ठळक मुद्देधरणातून पाणी द्या, या मागणीसाठी चार दिवसांपासून आंदोलन

औरंगाबाद : जायकवाडी धरणातीलपाणी आपेगाव-हिरडपुरी बंधाऱ्यात सोडण्यात यावे, या मागणीसाठी अन्नदाता शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयावर चाल केली. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी कार्यालयात सुमारे पाच तास ठिय्या दिला. कार्यकारी संचालक अ. प्रा. कोहिरकर यांनाही शेतकऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात कोंडून ठेवले.

धरणातून पाणी द्या, या मागणीसाठी चार दिवसांपासून संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पैठण येथे जायकवाडी पाटबंधारे विभागात आंदोलन करण्यात येत होते. या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेले जवळपास ६० आंदोलक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासमोर सायंकाळी ५ वाजता दाखल झाले. लोखंडी दरवाजा ढकलून पोलिसांना धक्का देऊन थेट कार्यालयाच्या इमारतीत प्रवेश केला. ‘पाणी द्या, पाणी द्या, हक्काचे पाणी द्या’, ‘पाणी आमच्या हक्काचे’ असे म्हणत घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर इमारतीचा मुख्य दरवाजा आतून लावून घेऊन सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले. संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली. 

सायंकाळचे ६ वाजून गेले होते. तेव्हा पोलिसांच्या आवाहनानंतर आंदोलकांनी मुख्य दरवाजा उघडला व कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी वाट मोकळी केली; पण त्याच वेळी आंदोलकांनी कोहिरकर यांच्या दालनाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. सुरुवातीला पोलिसांनी मध्यस्थी करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र आंदोलककर्त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. रात्री ११ वाजेपर्यंत कोहिरकर त्यांच्या दालनात बसून होते. जोपर्यंत पाणी सोडण्याची तारीख निश्चित केली जात नाही, याचे हमीपत्र देत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार, अशी घोषणा सूर्यवंशी यांनी केली.

रात्री ११ वाजेच्या सुमारास ‘लोकमत’ प्रतिनिधीने जयाजी सूर्यवंशी आणि कोहिरकर यांच्याशी संपर्क केला. सूर्यवंशी यांनी आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगितले. तर कोहिरकर म्हणाले की, मी अद्याप कार्यालयातच बसून आहे. ११ वाजेच्या सुमारासही पोलिसांनी आंदोलन मागे घेण्यासंदर्भात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलनकर्ते पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्यावर ठाम राहिले. 

या आंदोलनात प्रदीप नरके, शरद गुंते, नंदू गोरडे, दा.स. पवार, रावण टेकाळे, गजानन वाकडे, नानाभाऊ वाघमोडे, भाऊसाहेब नरके, सुनील कुलकर्णी, पवन औटे, कचरू गोरडे महाराज, द्रोणाचार्य नरके यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

पाण्याचा विषय सुटेपर्यंत आंदोलन जायकवाडी धरणातून बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे यासाठी १३ मेपासून जायकवाडी परिसरात आंदोलन सुरू आहे. १५ रोजी आम्ही गोदावरी पाटबंधारे विभागाच्या उत्तर विभागीय कार्यालयात आंदोलन सुरू केले, पण गुरुवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत कोणीच आंदोलनाची दखल घेतली नसल्याने आम्ही सायंकाळी ५ वाजता मुख्य कार्यालयात येऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. पाण्याचा विषय जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. - जयाजी सूर्यवंशी, नेते, अन्नदाता शेतकरी संघटना

अहवाल पाठविला, शासनस्तरावर निर्णय अपेक्षितजायकवाडी धरणातील पाणी सध्या मृतसाठ्यात आहे.हवामान विभागानुसार येत्या हंगामात उशिरा पावसाळ्याला सुरुवात होईल, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. आपेगाव-हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी होत आहे, तसेच परभणी, बीड जिल्ह्यांतूनही केली जात आहे. अशा परिस्थितीत पाणी सोडल्यास काय होईल, याचा सर्व बाजंूनी अभ्यास करून एक अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. शासनस्तरावर निर्णय अपेक्षित आहे. - अ. प्रा. कोहिरकर, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे  विकास महामंडळ 

टॅग्स :WaterपाणीagitationआंदोलनJayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद