शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

टँकरमुळे उद्योगांवर पाणी कपातीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:45 IST

जिल्ह्यात कमी प्रमाणात झालेला पाऊस, आटलेली भूजल पातळी, जोत्याखाली चाललेले जलाशय, यामुळे औरंगाबाद तालुक्यासह पूर्ण जिल्हा पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करीत आहे. टँकरवर ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा अवलंबून असल्यामुळे औद्योगिक वसाहतींतील जलकुंभांवरून टँकरचा भरणा केला जात आहे, परिणामी औद्योगिक वसाहतींचे पाणी ५० टक्क्यांनी कपात झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासन घेणार निर्णय : औद्योगिक वसाहतीतील जलकुंभावर टँकरची गर्दी

औरंगाबाद : जिल्ह्यात कमी प्रमाणात झालेला पाऊस, आटलेली भूजल पातळी, जोत्याखाली चाललेले जलाशय, यामुळे औरंगाबाद तालुक्यासह पूर्ण जिल्हा पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करीत आहे. टँकरवर ग्रामीण भागाचा पाणीपुरवठा अवलंबून असल्यामुळे औद्योगिक वसाहतींतील जलकुंभांवरून टँकरचा भरणा केला जात आहे, परिणामी औद्योगिक वसाहतींचे पाणी ५० टक्क्यांनी कपात झाले आहे.एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याबाबत काहीही निर्णय अजून तरी झालेला नाही. अनियोजित पाणी कपातीबाबत सोमवारी एमआयडीसीअधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांची होणारी बैठक रद्द झाली, आता मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे याप्रकरणी बैठक होणार आहे.एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून समजलेली माहिती अशी, शेंद्रा, वाळूज औद्योगिक वसाहतीतील जलकुंभांवर टँकरचालक पाण्याची लेव्हल येऊ देत नाहीत. शेंद्रा येथील जलकुंभावर सरपंचांपासून सगळ्यांचीच गर्दी असते. जिल्हा प्रशासन एमआयडीसीवर सर्व जबाबदारी टाकून मोकळे झाले आहे. शेंद्रा येथील पाणीपुरवठा क्षमता कमी आहे. याची जाणीव जिल्हा प्रशासनाला करून दिलेली आहे. एमआयडीसीवरील भार कमी केला नाही तर उद्योगांना पाणी असताना त्रास सहन करावा लागेल. टँकरचालक जलकुंभाचा ताबा घेऊन एमआयडीसीच्या २ कर्मचाºयांवर दादागिरी करतात. ११४ टँकरचालक आणि क्लीनरची गर्दी रोजची आहे.एप्रिल महिन्यापर्यंत उद्योगांना त्रासपिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची जिल्हा प्रशासनाची भूमिका योग्य आहे; परंतु त्यासाठी उद्योगांच्या पाण्याचे काय करायचे, याबाबत प्रशासन काहीही सांगत नाही. टँकरभरणा केंद्र वाढवून कसे जमेल. ३.८३ एमएलडी पाणी टँकरसाठी जात आहे. ११४ टँकरच्या २२८ फेºया होतात. २४ हजार लिटरचे १६० टँकर आहेत. शेंद्रा येथे ५ ते ७ एमएलडी पाण्याची क्षमता आहे. अर्धे पाणी टँकरला दिल्यानंतर उद्योगांना किती द्यायचे, जालन्याकडे किती पाठवायचे, असा प्रश्न एमआयडीसी पाणीपुरवठा विभागासमोर आहे. एप्रिल महिन्यापर्यंत काही तालुक्यांसाठी पर्यायी व्यवस्था होईल, तोपर्यंत उद्योगांना त्रास होईल, असे एमआयडीसी सूत्रांनी सांगितले.चारा छावण्यांचा भार एमआयडीसीवरजिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, ५५७ गावे व २२२ वाड्यांवर राहणाºया १२ लाख ५६ हजार नागरिकांना ८०१ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. औरंगाबाद तालुक्यातील ८३, फुलंब्रीतील ३९, पैठण ८६, गंगापूर १२२, वैजापूर ९१, खुलताबाद १९, कन्नड ४१, सिल्लोड ७८, तर सोयगाव तालुक्यातील तीन गावांमध्ये टँकर सुरू आहेत. त्यातच चारा छावण्यांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी एमआयडीसीवर देण्यात आली आहे.फिलिंग स्टेशन वाढवून काय होणारजायकवाडी मृत जलसाठ्याकडे जाण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे एमआयडीसीच्या जॅकवेल, पंपिंगची अडचण येणार आहे. एमआयडीसीच्या पाणी क्षमतेचा विचार जिल्हा प्रशासनाने करणे गरजेचे आहे. धरणातच पाणी कमी झाले तर देणार कुठून, असा प्रश्न आहे. ब्रह्मगव्हाण येथे डब्ल्यूपीटी पंपिंग करून चिकलठाण्यापर्यंत पाणी आणले जाते. ते पंपिंग करून शेंद्र्याकडे पाठविले जाते. १०० कि़मी.चे एमआयडीसीचे नेटवर्क आहे. त्यातून २०० कि़मी.च्या परिसरात पाणीपुरवठा करावा लागतो.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईMIDCएमआयडीसी