शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

उद्योगांवरील पाणीकपात तूर्तास टळली हाच दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:24 IST

. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यामुळे औरंगाबाद शहर व इतर औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत होते.

ठळक मुद्दे जायकवाडी जलाशयात ३१.५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या काहीही निर्णय होणार नसल्याचे उद्योजकांना सांगितल्यामुळे तूर्तास पाणीकपात टळली आहे. 

औरंगाबाद : जायकवाडी जलाशयात ३१.५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यामुळे औरंगाबाद शहर व इतर औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांवर पाणीकपातीचे संकट घोंगावत होते. उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याशी गेल्या आठवड्यात औपचारिक चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या काहीही निर्णय होणार नसल्याचे उद्योजकांना सांगितल्यामुळे तूर्तास पाणीकपात टळली आहे. 

२०१५ साली उद्योगांचे १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांनी घेतला होता. ती कपात जून २०१६ पर्यंत कायम होती. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे जायकवाडीतील पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. जून २०१९ पर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे ही तारेवरची कसरत असणार आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंत पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन नियोजन करीत आहे. जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. 

शिवाय दोन लाख शेतकरीदेखील अवलंबून आहेत. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील गावे, औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १५० ते १६० एमएलडी पाणीपुरवठा होतो आहे, तर उद्योगांना ५२ एमएलडी पाणी उपसा होतो. औरंगाबादला रोज २ द.ल.घ.मी पाणी लागते. 

उद्योग संघटनेचे मत असेमसिआ या उद्योजक संघटनेचे अध्यक्ष किशोर राठी म्हणाले, सध्या उद्योगांना पाणीपुरवठा बऱ्यापैकी होतो आहे. शनिवारी अडचण येते, त्यामुळे टँकरने पाणी मागवावे लागते. शुक्रवारी वीज वितरण कंपनीचे शटडाऊन होते, त्यामुळे शनिवारी एमआयडीसीचे जलकुंभ भरत नाहीत. रविवारी सुरळीत पाणीपुरवठा केला जातो. उद्योगांची पाणीकपात होण्यासारखी परिस्थिती सध्या तरी नाही, त्यामुळे प्रशासन याबाबत सध्या काही निर्णय घेणार नाही, अशी माहिती उद्योगवर्तुळात आहे. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीMASSIA marathwada small scale industries associationमराठवाडा लघु उद्योग संघटना (मसिआ)