शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

औरंगाबादकरांवर जल संकट; पाणीपट्टी थकल्याने २७ डिसेंबरपासून जायकवाडीहून पाणी होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 19:22 IST

पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले.

ठळक मुद्देमनपावर नामुष्कीचे संकट पाणीपट्टी थकल्याने पाटबंधारे विभागाने बजावली अंतिम नोटीस

औरंगाबाद : आर्थिक संकटात सापडलेल्या मनपावर आणखी एक नामुष्की ओढावली आहे. जायकवाडी धरणातून दररोज उपसा करण्यात येणाऱ्या पाण्याचे बिल तब्बल १० कोटींहून अधिक थकले आहे. तब्बल १७ नोटिसा पाठविल्यानंतरही महापालिकेने पाणीपट्टी भरण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने महापालिकेला अंतिम नोटीस पाठवून २७ डिसेंबरपासून चक्क पाणीपुरवठाच बंद करण्याचा इशारा दिला आहे.

जायकवाडी धरणातून महापालिकेने शहरासाठी वार्षिक ११३.२८ दलघमी एवढे पाणी आरक्षित केले आहे. रोज १५० एमएलडी पाणी मनपा धरणातून घेत आहे. मनपा प्रशासन जेवढे पाणी धरणातून घेत आहे, त्याची पाणीपट्टीही पाटबंधारे विभागाला भरणे आवश्यक आहे. महिन्याला सुमारे १८ ते २० लाख रुपये जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून आकारले जाते. दरमहा ही रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरणे अभिप्रेत आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंबंधीची संचिका लेखा विभागाकडे पाठविली आहे. अद्यापही लेखा विभागाकडून ही रक्कम अदा केली नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

दरम्यान, पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले. महापालिकेने नेहमी या नोटिसीला केराची टोपली दाखविली. परिणामी, नोव्हेंबर २०१८ पर्यंत १० कोटी ६८ लाख ६० हजार रुपये पाणीपट्टीपोटी भरावे, अशी नोटीस पाटबंधारे विभागाने बजावली आहे. पाणीपट्टी तात्काळ अदा न केल्यास २७ डिसेंबरपासून पाणी कपात करण्यास सुरुवात केली जाईल. ३१ डिसेंबरला पूर्ण पाणी उपसाच बंद करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये बजावले आहे. पाण्याचा उपसा बंद केल्यानंतर शहरवासीयांची जी गैरसोय होणार आहे, त्यास पूर्णत: पालिका जबाबदार राहील, असेही बजावले आहे. पाणीपुरवठा बंद करण्याची नोटीस प्राप्त झाल्यानंतरही मनपा कुंभकर्णी झोपेत आहे. मागील दोन महिन्यांपासून कंत्राटदारांना एक छदामही अदा करण्यात आलेला नाही. तिजोरीत ३० ते ३५ कोटी रुपये पडून आहेत. शहराचे पाणी बंद होऊ नये म्हणून पाणीपट्टी भरण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही, हे विशेष.

२४ तास मनपाकडून उपसाशहरातील १६ लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी महापालिका जायकवाडी येथून ७०० आणि १४०० मि. मी. व्यासाच्या दोन जलवाहिन्यांद्वारे २४ तास पाण्याचा उपसा करीत आहे. पाणीपुरवठ्याच्या दोन्ही योजनांसाठी सहा पंप २४ तास चालवावे लागतात. 

पाणी कपातीचा कार्यक्रम२७ डिसेंबर - जायकवाडीत पाण्याचा उपसा दोन तास बंद केला जाईल.२८ डिसेंबर - चार तासांसाठी उपसा बंद केला जाणार आहे.२९ डिसेंबर -सहा तास उपसा बंद राहील.३० डिसेंबर - आठ तास पाण्याचा उपसा बंद राहील.३१ डिसेंबर - पाणी उपसा पूर्णत: बंद केला जाईल. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी