शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

औरंगाबाद येथील औद्योगिक वसाहतींवर दोन दिवस जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:56 IST

शेंद्रा, चिकलठाणा, औरंगाबाद, जालना औद्योगिक वसाहतीला १ जून रोजी पाणीपुरवठा होणार नाही, तर २ जून रोजी दुपारनंतर कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेंद्रा, चिकलठाणा, औरंगाबाद, जालना औद्योगिक वसाहतीला १ जून रोजी पाणीपुरवठा होणार नाही, तर २ जून रोजी दुपारनंतर कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. सलग दोन दिवस औद्योगिक वसाहतींवर जलसंकटाचा फेरा राहणार आहे. एकतर पंधरा दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातच एमआयडीसीने ७०० मि.मी.च्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे ठरविल्यामुळे औद्योगिक वसाहतींना पाणीटंचाई भासत आहे.एमआयडीसी चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज ईएसआर, पैठण येथील जलकुंभावर टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला असून, २१ मेपासून उद्योजक संघटना एमआयडीसीसोबत बैठका घेऊन तोडगा काढण्याची मागणी करीत आहे. ६ एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा भार एमआयडीसीवर पडल्यामुळे पाणीपुरवठा विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. २०० हून अधिक टँकर एमआयडीसीच्या जलकुंभावरून भरले जात आहेत. पूर्ण क्षमतेने पाणी उपसा १००० मि. मी. व्यासाची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने ७२ एमएलडी पाण्याचा उपसा सध्या करते आहे.एमआयडीसीने कळविले आहे की, महामंडळाच्या ७०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे औरंगाबाद, चिकलठाणा, शेंद्रा व जालना औद्योगिक क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा १ जून रोजी बंद राहील. तसेच २ जून रोजी ३ वाजेनंतर कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे कार्यकारी अभियंता रवींद्र कुलकर्णी यांनी कळविले आहे.

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबादwater shortageपाणीकपात