जलसमाधी आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात
By Admin | Updated: December 25, 2015 00:03 IST2015-12-24T23:54:31+5:302015-12-25T00:03:44+5:30
नवीन नांदेड : जुनाकौठा भागातील गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलनासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून सोडून दिले.

जलसमाधी आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात
नवीन नांदेड : कर्ज माफी आणि मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी जुनाकौठा भागातील गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलनासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून सोडून दिले.
अ. भा. छावा संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २३ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता जुना कौठा भागातील गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलन करण्यासाठी १५-२० कार्यकर्ते उपस्थित झाले. नांदेड जिल्हाध्यक्ष काळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी दशरथ संभाजी कपाटे, शिवाजी जाधव, शंकर जाधव, श्रीनिवास ताटे, शेषेराव उमाटे, बालाजी पाटील व अन्य ९ कार्यकर्ते जलसमाधी आंदोलन करण्यासाठी नदीच्या पात्रात उतरत होते. त्याचवेळी,सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे व त्यांच्या अन्य सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांनी नऊ कार्यकर्त्यांना महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ६८ अन्वये ताब्यात घेवून ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबतचे निवेदन स्विकारण्यात आले, तद्नंतर म. पो. का. कलम ६९ प्रमाणे उपरोल्लेखित आंदोलनकर्त्यांना सोडण्यात आले असल्याची माहिती ठाणे अंमलदार तथा पोहेकॉ. प्रकाश कागणे व व्यंकटराव गोत्राम यांनी दिली. (वार्ताहर)