शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात पाणी पेटले; अहमदनगर, नाशिकच्या नेत्यांविरोधात आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 08:09 IST

‘नका करू दादागिरी, पाणी सोडा नाथसागरी’ घोषणा देत सर्वपक्षीय नेत्यांचा रास्ता रोको

लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातून मराठवाड्याला ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयाची  अंमलबजावणी होऊ नये, यासाठी दोन्ही जिल्ह्यांतील नेत्यांनी सुरू केलेल्या दादागिरीविरोधात मराठवाड्यातील भाजप वगळता  सर्वपक्षीय  नेत्यांनी सोमवारी शहरातील जालना रोडवर रास्ता रोको केला.  जोपर्यंत गोदापात्रात पाणी सोडत नाही,  तोपर्यंत आंदोलन  मागे घेणार नाही, अशी भूमिका  आंदोलकांनी घेतल्यामुळे जालना रोडवरील वाहतूक तब्बल साडेचार तास ठप्प झाली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून माजी मंत्री राजेश टोपे, अनिल पटेल, माजी आ. कल्याण काळे, कैलास गोरंट्याल यांच्यासह सुमारे १०० आंदोलकांना ताब्यात घेत आंदोलन चिरडून टाकले.

मराठवाड्यात आगामी काळात भीषण  पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. जायकवाडी प्रकल्पात केवळ ४२ टक्के जलसाठा उरला आहे. 

पोलिस ठाण्यासमोर तीन तास ठिय्यामाजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह अन्य आंदोलकांना ताब्यात घेऊन एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथेही त्यांनी ठोस आश्वासन मिळेपर्यंत ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. पाणी सोडण्याची तारीख जाहीर करण्यावर आंदोलक ठाम हाेते. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर, रात्री ८ वाजता विभागाने आश्वासनाचे पत्रच सुपूर्द केल्यानंतर टोपे यांनी आंदोलन स्थगित केले.

गंगापूर धरणावर धडक नाशिक : जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने परभणी येथील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये येऊन गंगापूर धरणावर धडक दिली. त्यामुळे यंत्रणेचीधावपळ उडाली. 

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी  ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातील पाणी पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये सोडू नये आणि गोदावरी मराठवाडा पाठबंधारे विकास महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या ३० ऑक्टोबर २०२३ च्या आदेशाला स्थगिती मिळावी यासाठी संजीवनी (टाकळी) सहकारी साखर कारखाना आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखाना यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांना विरोध करण्यासाठी मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज व डॉ. कल्याण काळे यांनी दोन स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले आहेत. यावर न्यायालय काय निर्णय देते याकडे लक्ष लागले असून २१ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :paithan-acपैठणMarathwadaमराठवाडाWaterपाणी