शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

तो ओरडत राहिला, त्यांना दया आली नाही; हातपाय बांधून दंडुक्याने मारहाणीत वॉचमनचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 13:47 IST

मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने मनोजच्या भावाला मारहाणीचा व्हिडीओ पाठवला.

औरंगाबाद : शहरातील मेघवाले हॉल येथे काम करत असलेल्या एका वॉचमनला फोकस लाईट्स चोरीच्या संशयातून आठ जणांनी हातपाय बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. मारहाण करणाऱ्या एकाने घाटी रुग्णालयात दाखल केलेल्या गंभीर जखमी वॉचमनला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मनोज शेषराव आव्हाड असे मृताचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगरसेवकाचा मुलगा असल्याची माहिती आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील विवेकानंद नगर येथील मेघवाले सभागृहात मनोज आव्हाड वॉचमन म्हणून काम करत असे. मनोज पत्नी आणि मुलांसह सभागृहाच्या एका खोलीत राहत. या सभागृहाचे काम माजी नगरसेवक गणपत खरात यांचा मुलगा सागर खरात हे पाहतो. येथेच सतीश खरे मंडपचे काम करतो. काही दिवसांपूर्वी येथील मनोजची पत्नी माहेरी गेली आहे. यातच त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. यामुळे बुधवारी तो चंपाचौक येथे राहणाऱ्या आईकडे गेला होता. 

दुपारी ३ वाजेच्या दरम्यान सतीश खरे सात आठ मुलांसोबत चंपाचौक येथील घरून मनोजला मंडप कामासाठी म्हणून घेऊन गेला. त्यानंतर मनोजला मेघवाले हॉल येथे आणत फोकस लाईट्सच्या चोरीचा जाब विचारण्यात आला. यावेळी वाद झाल्याने सतीश खरे, सागर खरात, आनंद सोळस, आनंद गायकवाड, अष्टपाल गवई,  सागर खरातचा भाऊ आणि इतर तिघांनी हातपाय बांधून लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात मनोज गंभीर जखमी झाला. संध्याकाळी गंभीर जखमी मनोजला घाटी रुग्णालयात दाखल करून मारहाण करणारा अष्टपाल पसार झाला. येथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले

मोठ्या भावाला पाठवला व्हिडीओविशेष म्हणजे, मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने मनोजच्या भावाला मारहाणीचा व्हिडीओ पाठवला. तेव्हा मनोजला भाऊ आणि आई कार्यक्रमानिमित्त शेंद्रा येथे होते. व्हिडीओ पाहताच त्यांनी औरंगाबाद येथील सतीश खरेचे घर गाठले. मात्र तो घरी नव्हता,त्यानंतर ते मेघवाले सभागृहात आले, तेथेही लॉक होते. दरम्यान, मनोजला घाटी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्यांना मिळाली. घाटी रुग्णालयात जाताच आव्हाड कुटुंबियांना मनोज मृत झाल्याचे समजले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू