अवकाळीने महामार्गाची ‘वाट’

By Admin | Updated: April 15, 2015 00:43 IST2015-04-15T00:21:53+5:302015-04-15T00:43:50+5:30

बीड : शहरातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठाले खड्डे पडले असून यामध्ये वाहने अडकत आहेत.

The 'WAT' of the Holocaust Highway | अवकाळीने महामार्गाची ‘वाट’

अवकाळीने महामार्गाची ‘वाट’


बीड : शहरातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठाले खड्डे पडले असून यामध्ये वाहने अडकत आहेत. अवकाळीने खड्यांची खोली वाढत असून हे खड्डे वाहनचालकांसाठी धोक्याचे ठरत आहेत.
शहराला आगोदरच बायपास आणि उड्डाणपुल नाही. अवजड वाहनांची चोवीस तास वर्दळ असते. यापूर्वी अनेक बळी गेलेले आहेत.
शहरात आगमण केल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत सुमारे दीडशे ते दोनशे खड्ड्यांचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. जिल्हा रूग्णालय, केएसके रोड, राष्ट्रवादी भवन, बार्शी नाका या ठिकाणी तर चारचाकी वाहने अडकतील एवढे खड्डे पडले आहेत. या खड्यांमध्ये वाहने अडकल्याच्या अनेक घटना मागील दहा दिवसांपासून घडल्या आहेत. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुचाकीस्वारांना जखमाही झाल्याचे आढळून आले आहे. दरम्यान पाऊस पडल्यानंतर खड्डयांमध्ये पाणी साचून राहते. खड्डे दिसून येत नसल्यामुळे वाहने आदळून अपघाताला निमंत्रण मिळते. शिवाय चिखलामुळे वाहने घसरण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

Web Title: The 'WAT' of the Holocaust Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.