विटांसाठी पाण्याची नासाडी

By Admin | Updated: April 16, 2016 00:07 IST2016-04-15T23:31:50+5:302016-04-16T00:07:06+5:30

संजय खाकरे ल्ल परळी वीटभट्ट्या पर्यावरणासाठी पहिल्यापासूनच घातक ठरल्या आहेत. एकट्या परळी तालुक्यात चारशेहून अधिक अनधिकृत वीटभट्ट्या आहेत.

Waste of bricks for the bricks | विटांसाठी पाण्याची नासाडी

विटांसाठी पाण्याची नासाडी

प्रदूषण वाढले : अनधिकृत वीट भट्ट्यांची संख्या ४०० हून अधिक
संजय खाकरे ल्ल परळी
वीटभट्ट्या पर्यावरणासाठी पहिल्यापासूनच घातक ठरल्या आहेत. एकट्या परळी तालुक्यात चारशेहून अधिक अनधिकृत वीटभट्ट्या आहेत. विटा बनविण्यासाठी भट्टीधारक दरदिवशी हजारो लिटर पाण्याचा वापर करीत असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे.
परळी - चांदापूर रोड, परळी-नंदागौळ रोड, परळी-मलकापूर रोड, परळी- कालरात्री देवी मंदिर रोड, परळी-टोकवाडी, नागापूर-पांगरी रोड या भागातील रस्त्यालगतच वीटभट्ट्या थाटल्याचे चित्र पहावयास मिळते. त्याचबरोबर वीट निर्मितीसाठी दररोज हजारो लिटर पाणी वापरले जाते. पाणी टंचाई लक्षात घेता प्रशासनाने जून-जुलै महिन्यापर्यंत या भट्ट्या बंद ठेवाव्यात जेणेकरुन पाण्याची बचत होईल व त्याचा वापर जवळपासच्या ग्रामस्थांना होईल, असे परळी न.प.चे नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा समिती सभापती नीलाबाई रोडे यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी तहसीलदार विद्याचरण कडवकर यांची भेट घेतली आहे. याबाबत प्रशासन काय निर्णय घेईल? याकडे लक्ष लागले आहे. वीटभट्ट्या अनधिकृत असल्यामुळे त्यांच्यावर प्रथम कारवाई केली पाहिजे, असा सूर सर्वसामान्यांतून उमटत आहे.
गंभीर समस्या : भट्ट्यांवर कारवाईची मागणी
परळी येथील वीटभट्ट्या अनधिकृत असल्या तरी त्या दर्जेदार असल्यामुळे राज्यभरातून मागणी असते. परळीत उत्पादित होणाऱ्या विटांमध्ये औष्णिक विद्युत केंद्रातील कोळशाची राख असते.
ज्या भागामध्ये तीव्र पाणीटंचाई आहे त्या ठिकाणच्या वीटभट्ट्या बंद करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. आतापर्यंत २० वीटभट्ट्या तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आल्या आहेत.
- विद्याचरण कडवकर, तहसीलदार

Web Title: Waste of bricks for the bricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.