वीजजोडणीचे अर्ज धुळखात
By Admin | Updated: December 9, 2015 00:42 IST2015-12-09T00:21:04+5:302015-12-09T00:42:09+5:30
राजेश खराडे , बीड महावितरण वाढत्या थकबाकीचा गाजावाजा करीत जिल्ह्यात भारनियमन करीत आहे. दुसरीकडे नव्याने विजकनेक्शनसाठी ग्राहकांनी उपविभागाकडे

वीजजोडणीचे अर्ज धुळखात
राजेश खराडे , बीड
महावितरण वाढत्या थकबाकीचा गाजावाजा करीत जिल्ह्यात भारनियमन करीत आहे. दुसरीकडे नव्याने विजकनेक्शनसाठी ग्राहकांनी उपविभागाकडे अर्जासह पैसे भरून देखील कनेक्शन मिळत नाही. अद्यापपर्यंत ६४०४ अर्ज प्रलंबीत असून यापोटी १ कोटी रुपये महावितरणकडे जमा आहेत.
नव्याने विजकनेक्शन करिता ग्राहकांना महावितरणकडे अर्ज दाखल करावे लागतात. त्यानुसार महिन्याच्या कालावधीतच अर्जदारांना विजकनेक्शन मिळने अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांच्या वर्गवारीनुसार विजजोडणीच्या कामांचे विभाजण गुत्तेदारांकडे करण्यात आले आहे. याकरिता आवश्यक असलेल्या साहित्याचा पुरवठादेखील महावितरणकडून करण्यात आला आहे. असे असतानाही जिल्ह्यात ६४०४ अर्ज विजकनेक्शनविना उपविभागीय कार्यालयात धूळखात पडून आहेत. यामध्ये घरगुती ग्राहकांची संख्या ही अधिक आहे. घरगुती ग्राहकांना कनेक्शन देणे सहज शक्य असतानाही गुत्तेदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. नव्याने घेण्यात येणाऱ्या कनेक्शसाठी कार्यालयीन खर्च केवळ १६०० रुपये असतानही अधिकची रक्कमेची मागणी केली जात आहे. यापूर्वी सर्व्हिस वायर व इतर साहित्याची महावितरणकडून पुर्तता केली जात होती. नियमावलीत बदल झाल्याने महावितरणकडून रकमेच्या बदल्यात मीटर देऊन इतर साहित्याचा खर्च ग्राहकांच्या पदरी पडत आहे. मीटर बसिवण्याकरिता निविदाच्या माध्यमातून गुत्तेदारांना २ कोटींचीे कामे देण्यात आली आहेत. गुत्तेदारांनी विजजोडणी न केल्यामुळे बदली मीटरच महावितरण कंपनीने ग्राहकांना दिले आहेत. त्यामुळे तात्पुरता प्रश्न मिटला असला तरी दिवसेंदिवस मीटर संदर्भात ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. महावितरणकडेही गुत्तेदारांचे पैसे रखडल्याने अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता गुत्तेदार कामास टाळाटाळ करीत आहेत. गुत्तेदार आणि महावितरण यांच्या वादामुळे मात्र ग्राहकांना पैसे भरूदेखील महावितरणची सेवा मिळत नाही. केवळ घरगुतीच नाही तर व्यापारी, औद्योगितक ग्राहकांचीही विजजोडणी रखडलेली आहे.
गुत्तेदार नावालाच
विजजोडणीची गुत्तेदारी नावालाच असून सर्व कामकाज महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाच करावे लागत आहे. ग्राहकांच्या तक्रारी महावितरण कार्यालयाकडेच दाखल होत आहेत. याबाबत अधिकारीही अनुत्तरीत असल्याने ग्राहकांचे प्रश्न कायम आहेत.