वॉरियर्स साखळी तलवारबाजी स्पर्धेस आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:14 IST2017-12-11T01:13:54+5:302017-12-11T01:14:10+5:30

जिल्हा तलवारबाजी संघटना व वॉरियर्स फेन्सिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साखळी तलवारबाजी स्पर्धेस उद्या, सोमवारपासून प्रारंभ होत आहे.

 Warriors Series Fencing Championships Starting today | वॉरियर्स साखळी तलवारबाजी स्पर्धेस आजपासून प्रारंभ

वॉरियर्स साखळी तलवारबाजी स्पर्धेस आजपासून प्रारंभ

औरंगाबाद : जिल्हा तलवारबाजी संघटना व वॉरियर्स फेन्सिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साखळी तलवारबाजी स्पर्धेस उद्या, सोमवारपासून प्रारंभ होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होणार आहे. याप्रसंगी भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रकाश काटुळे, सचिव डॉ. उदय डोंगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे यांच्यासह संजय भूमकर, महेश तवार, सूरज लिपणे आदींची उपस्थिती असणार आहे. या स्पर्धेत शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड व देवगिरी फेन्सर्स आदी संघांचे खेळाडू आपला कस पणाला लावणार आहेत. या संघांतील खेळाडूंना सागर मगरे, अजय त्रिभुवन, राहुल दणके, स्वप्नील तांगडे, तुषार आहेर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Web Title:  Warriors Series Fencing Championships Starting today