कोणत्याही वर्षातील तारखेचा सांगतो वार

By Admin | Updated: July 9, 2017 00:42 IST2017-07-09T00:39:42+5:302017-07-09T00:42:22+5:30

चित्तेपिंपळगाव :तब्बल १० वर्षांची दिनदर्शिका ही वार, तारखेनिहाय, लहान-सहान तिथींसह मुखोद्गत सांगणाऱ्या लायगावच्या १६ वर्षीय अंध विद्यार्थ्याची स्मरणशक्ती थक्क करणारी आहे.

Warranty of the date of any year | कोणत्याही वर्षातील तारखेचा सांगतो वार

कोणत्याही वर्षातील तारखेचा सांगतो वार

भाऊसाहेब शेजूळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चित्तेपिंपळगाव : वर्षभरातील महापुरुषांची जयंती, सण, उत्सवाच्या तिथी आणि तारखांनुसार वार सांगणे भल्याभल्या विद्वानांनाही शक्य नाही; पण तब्बल १० वर्षांची दिनदर्शिका ही वार, तारखेनिहाय, लहान-सहान तिथींसह मुखोद्गत सांगणाऱ्या लायगावच्या १६ वर्षीय अंध विद्यार्थ्याची स्मरणशक्ती थक्क करणारी आहे.
काकासाहेब बोंगाणे असे अंध विद्यार्थ्याचे नाव आहे. तो दगडू बोंगाणे यांचा मुलगा. त्यांना दोन मुली व दोन मुले आहेत. त्यापैकी काकासाहेब तिसऱ्या नंबरचा. जन्मजात अंध. या कुटुंबाकडे उपजीविकेसाठी वडिलोपार्जित सव्वा एकर शेती आहे. त्यामुळे परिस्थिती बेताचीच; परंतु मेहनत, मोलमजुरीने दगडू बोंगाणे कुटुंबाचा गाडा ओढतात. काकासाहेबच्या अचाट स्मरणशक्तीचा प्रत्यय तो दोन वर्षांचा असतानाच येऊ लागला. दोन वर्षांचा चिमुकला बहुतांश गोष्टी स्मरणात ठेवू लागला. तो शाळेत जाण्याचा आग्रह धरू लागला. काकासाहेबला २००६ मध्ये एका अंध विद्यालयात प्रवेश देण्यात आला. आज तो इयत्ता आठवीत आहे.
वाढत्या वयासोबतच त्याची स्मरणशक्तीही वेगाने विकसित होत होती. सध्या तर तो २०१० ते २०२० या कालावधीतील कॅलेंडरवरील तारीख व वार तिथीसह तोंडपाठ सांगतो. गतवर्षीचे कॅलेंडर असो की आगामी वर्षाचे. तुम्ही मोबाइलवर कॅलेंडर उघडून त्याची परीक्षा घेऊ शकता. आलटून पालटून प्रश्न विचारले तरीही न अडखळता तो उत्तर देतो. पुढे शिक्षण निरंतर चालू ठेवून अपंगत्वावर मात करून कुटुंबाला व भावंडाला मदत करण्याची इच्छा काकासाहेब बोलून दाखवितो.

Web Title: Warranty of the date of any year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.