पालिका मुख्याधिकारी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

By Admin | Updated: December 23, 2015 23:58 IST2015-12-23T23:08:57+5:302015-12-23T23:58:01+5:30

बीड : नगर परिषद कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात केलेले ५९ हजार रुपये परत देण्याचे आदेश न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांना ग्राहक मंचाने देऊनही ते भरले नाहीत.

Warrant against arrest of municipal chief | पालिका मुख्याधिकारी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

पालिका मुख्याधिकारी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट


बीड : नगर परिषद कर्मचाऱ्याच्या वेतनातून कपात केलेले ५९ हजार रुपये परत देण्याचे आदेश न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांना ग्राहक मंचाने देऊनही ते भरले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरूध्द अटक वॉरंट काढण्यात आले आहे.
नवनाथ मारोती राऊत हे नगर परिषदेचे कर्मचारी असून, १९९९ मध्ये त्यांनी द्वारकादास मंत्री बँकेकडून ४० हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. त्यांनी या कर्जापोटी २ लाख रूपयांची परतफेड केली होती. नवनाथ राऊत यांनी ग्राहक मंचामध्ये द्वारकादास मंत्री बँक व मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांच्याविरूध्द प्रकरण दाखल केले होते. ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षांनी या प्रकरणाची सुनावणी घेऊन राऊत यांच्या पगारातून कर्ज हप्ता कपात करू नये, असे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले होते. तरीही राऊत यांच्या पगारातून ५९ हजार रूपये कपात केले गेले. त्यामुळे राऊत यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी ५९ हजार रूपये भरण्याचे आदेश मंचाने दिले होते. आदेशाची समज देऊनही रक्कम भरली गेली नाही. त्यामुळे ग्राहक मंचाने मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्याविरूध्द अटक वॉरंट काढले आहे. यापूर्वीही एक वेळेस त्यांच्याविरूध्द अटक वॉरंट निघाले आहे. राऊत यांच्या वतीने अ‍ॅड. अनिल गंडले यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Warrant against arrest of municipal chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.