नाथमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:07 IST2021-07-14T04:07:12+5:302021-07-14T04:07:12+5:30
पैठणच्या बसस्थानकातून थेट नाथमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे. राज्यभरातून येणाऱ्या वारकरी व भाविकांना गटारीचे पाणी ओलांडून या ...

नाथमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
पैठणच्या बसस्थानकातून थेट नाथमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे. राज्यभरातून येणाऱ्या वारकरी व भाविकांना गटारीचे पाणी ओलांडून या रस्त्याने मार्गक्रमण करावे लागत असल्याने मोठी कुचंबणा होत आहे. दरम्यान, रस्त्यासाठी या मार्गावरील व्यापाऱ्यांनी न. प. प्रशासनास आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत ढोलेश्वर व्यापारी मंडळाने न.प. प्रशासनास वारंवार निवेदने दिली; परंतु दखल घेण्यात आली नाही, असे विष्णू ढवळे यांनी सांगितले. याबाबत व्यापाऱ्यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके, मुख्याधिकारी संतोष आगळे व पोनि. किशोर पवार यांना निवेदन देऊन २२ जुलै रोजी या रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर विष्णू ढवळे , किशोर सदावर्ते, ह.भ.प. विलास महाराज मोरे, शिवाजी चव्हाण, ईश्वर मोरे, ज्ञानेश्वर गुंजाळ, कैलास पवार, भाऊसाहेब पठाडे, सुरेश राऊत, कृष्णा पंडूरे, गणेश जुंजे, देवीदास पारवे, कल्याण क्षीरसागर, दगडू शेख, राजेंद्र बडसल, दत्ता काळे, राजू हजारे, रामदास काळे, भारत चिंचखेडे, दत्ता गायकवाड, उत्तम साबळे, गणेश मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.