शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या पाणीपुरवठ्याला ‘हाय अलर्ट’चा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:41 IST

छावणी भागात दूषित पाण्यामुळे तब्बल २७०० नागरिकांना गॅस्ट्रो झाल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे. शहरात अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी मनपाच्या पाणीपुरवठ्याला हाय अलर्टचे आदेश देण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : छावणी भागात दूषित पाण्यामुळे तब्बल २७०० नागरिकांना गॅस्ट्रो झाल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे. शहरात अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी मनपाच्या पाणीपुरवठ्याला हाय अलर्टचे आदेश देण्यात आले असून, छावणी भागात नागरिकांना गॅस्ट्रो कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी मनपाच्या शहर अभियंत्यांकडे चौकशी सोपविण्यात आली आहे. २४ तासांमध्ये अहवाल द्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.महापालिका जायकवाडीहून दररोज १३५ एमएलडी पाणी शहरात आणते. त्यातील ३ ते ४ एमएलडी पाणी मनपा छावणी परिषदेला देते. परिषद आपल्या सोयीनुसार नागरिकांना पाणीपुरवठा करते. शनिवारी रात्री अचानक या भागातील नारिकांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. अवघ्या ४८ तासांमध्ये रुग्णसंख्या तब्बल २७०० पर्यंत गेली. त्यामुळे मनपा प्रशासनही हादरले. सोमवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी छावणीत जाऊन रुग्णांची पाहणी केली. महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणाही संपूर्णपणे छावणी परिषदेला मदत करीत आहे. औषधीही देण्यात आली आहे. माणुसकीच्या नात्याने महापालिका छावणी परिषदेच्या मदतीला धावून गेल्याचे महापौरांनी पत्रकारांशी नमूद केले.शहरातही गॅस्ट्रोची साथ उद्भवू नये यासाठी हाय अलर्टचा इशारा मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला देण्यात आला. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये दूषित पाणीपुरवठा होऊ नये यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लाइनमन बांधवांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. छावणी भागात मनपाकडून पाणी कशा पद्धतीने देण्यात येते. खराब व्हॉल्व्ह कोठे होता, दूषित पाण्याचे मिश्रण कुठे झाले, या सर्व प्रश्नांचा शोध घेण्याची जबाबदारी महापौरांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यावर सोपविली. त्यांनी २४ तासांमध्ये आपला अहवाल द्यावा, असेही सांगण्यात आले.