शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नाथ मंदिर परिसरातून वारकरी महिलेची पर्स हिसकावली; चोरटे दुचाकीवरून पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 16:44 IST

हेल्मेट घातलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद....

पैठण : नाथ मंदिर परिसरात देवदर्शनासाठी आलेल्या वारकरी महिलेची पर्स  मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर हेल्मेट घालून आलेल्या दोन भामट्यांनी बळजबरीने हिसकावून घेतली. दरम्यान दोघेही चोरटे मंदीरापासून काही अंतरावर असलेल्या सीसीटीव्हीच्या कँमेऱ्यात कैद झाले आहेत. 

धुलीवंदनानिमित्त मंगळवारी चौका चौकात पोलीस बंदोबस्त असताना दिवसाढवळ्या मंदिर परिसरात वारकरी महिलेच्या पर्स चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नाथषष्ठी यात्रेच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी पोलीसांना आव्हान दिल्याची चर्चा शहरात होत आहे. सुनंदा मधुकर रोटे  (५०) रा नसीराबाद जिल्हा जळगाव, या महीला वारकरी   दिंडी सोबत देवदर्शनासाठी पैठण येथे आल्या होत्या. पैठण येथील नाथ समाधी मंदीर परीसरात  फिरत असताना मोटरसायकल वरील हेल्मेट घातलेल्या दोन   तरुणांनी अचानक जवळ येत सुनंदाबाईच्या हातातील पर्स  हिसकावून घेतली. चोरटे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पळून गेल्याचे तेथील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पर्समध्ये ८ हजारांची रोख रक्कम आणि मोबाईल असा २० हजार रूपयांचा ऐवज होता. 

सुनंदा रोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठाणे अंमलदार गोपाळ पाटील यांनी अज्ञात चोरट्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतिश भोसले, सुधीर वाव्हळ, मनोज वैद्य, आदी चोरट्यांचा शोध घेत आहेत. 

पोलीस ठाण्याचा प्रभारी कारभारनाथषष्ठी यात्रेत जालना, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील चोरटे सहभागी होऊन चोऱ्या करतात असा अनुभव आहे. दरवर्षी पोलीस यंत्रणेस या चोरट्यावर नजर ठेवावी लागते. यंदा नाथषष्ठीच्या तोंडावर नाथ मंदीर परिसरात चोरी करून पोलीसांना सलामी दिली आहे.  त्यातच पैठण पोलीस ठाण्याचा प्रभारी कारभार आहे. यामुळे चोरट्यावर धाक व वचक राहणार नसल्याने सदरच्या घटनेमुळे भाविक व वारकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद