शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

वॉर्ड आरक्षणात कहीं खुशी, कहीं गम; 'या' दिग्गजांना बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 4:22 PM

महापौर नंदकुमार घोडेले यांचा इटखेडा वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे.

ठळक मुद्देविष्णूनगर वॉर्ड नावालाच शिल्लक आहे. या वॉर्डाचा ९० टक्केभाग बौद्धनगर-उत्तमनगरला जोडला आहे. ज्येष्ठ नगरसेवक राजू वैद्य यांचा विद्यानगर वॉर्ड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाला आहे.

औरंगाबाद : भाजपचे राजू शिंदे, शिवसेनेचे त्र्यंबक तुपे यांची सोय झाली आहे. शिंदे यांचा पूर्वीचा ३८ क्रमांकाचा आणि सुधारित २३ क्रमांकाचा वॉर्ड एमआयडीसी चिकलठाणा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाला आहे. २०१५ च्या निवडणुकीतही हा वॉर्ड याच प्रवर्गासाठी आरक्षित होता. तुपे यांचा जुना वॉर्ड क्रमांक ७५ बौद्धनगर-उत्तमनगर असलेला वॉर्ड आता ७३ क्रमांकावर असून, मागील निवडणुकीप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला आहे. भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांचा विश्रांतीनगर वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला असून, त्यांचा जुना वॉर्ड ७६ एन-३, एन-४ पारिजातनगर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव झाला. विष्णूनगर वॉर्ड नावालाच शिल्लक आहे. या वॉर्डाचा ९० टक्केभाग बौद्धनगर-उत्तमनगरला जोडला आहे. 

महापौर नंदकुमार घोडेले यांचा इटखेडा वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. मात्र, शेजारी कांचनवाडी-नक्षत्रवाडी हा वॉर्ड नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला असल्यामुळे त्यांची सोय झाली आहे. ईटखेडा वॉर्डात घोडेले कुटुंबातील महिला नशीब अजमावू शकतात. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा शिवाजीनगर वॉर्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. सभागृहनेते विकास जैन यांचा वेदांतनगर वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाला आहे. पुढील महापौर खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे जैन यांनी वॉर्ड सोयीचा करून घेतल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांचा क्रांतीनगर उस्मानपुरा वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. स्थायी समिती सभापती जयश्री कुलकर्णी यांचा जवाहर कॉलनी वॉर्ड नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.

ज्येष्ठ नगरसेवक राजू वैद्य यांचा विद्यानगर वॉर्ड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. त्यांचा जुना क्रांतीचौक वॉर्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. माजी महापौर भगवान घडामोडे यांचा रामनगर वॉर्ड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. आणखी एक माजी महापौर गजानन बारवाल यांचा पदमपुरा वॉर्ड इतर मागासवर्ग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. माजी उपमहापौर विजय औताडे यांचा मयूरपार्क  वॉर्ड अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांचा अंबिकानगर वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. शिवसेनेचे गटनेते मकरंद कुलकर्णी यांचा गणेशनगर वॉर्ड ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाला आहे. एमआयएमचे गटनेते गंगाधर ढगे यांचा भडकलगेट बुढीलेन वॉर्ड खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाला आहे. माजी सभापती मोहन मेघावाले यांचा रोजाबाग-भारतनगर वॉर्डदेखील आरक्षित झाला आहे. 

वॉर्ड आरक्षणाचा या विद्यमान नगरसेवकांना बसला फटकानगरसेवक, कंसात आरक्षित वॉर्डपूनम बमणे (सर्वसाधारण महिला), राजगौरव वानखेडे (सर्वसाधारण महिला), सीताराम सुरे (अनुसूचित जाती महिला), सचिन खैरे (इतर मागासवर्ग महिला), प्रेमलता दाभाडे (नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला), अफसर खान (सर्वसाधारण महिला), नासेर सिद्दीकी (सर्वसाधारण महिला), जमीर कादरी (अनुसूचित जाती महिला), सीमा खरात (नागरिकांचा इतर मागासवर्ग), नितीन चित्ते (महिला), गोकुळसिंग मलके (महिला), फेरोज खान (नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला), राजू तनवाणी (नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला), कीर्ती शिंदे (अनुसूचित जाती महिला), शिवाजी दांडगे (महिला), ऋषिकेश खैरे (नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला), माधुरी अदवंत (नागरिकांचा मागास प्रवर्ग), सत्यभामा शिंदे (अनुसूचित जाती), मनीषा मुंडे (अनुसूचित जाती), दिलीप थोरात (महिला), सुमित्रा हाळनोर (अनुसूचित जाती), सिद्धांत शिरसाट (महिला), कैलास गायकवाड (नागरिकांचा इतर मागासवर्ग महिला), अप्पासाहेब हिवाळे (अनुसूचित जाती महिला), सायली जमादार (अनुसूचित जाती) यांचे वॉर्ड आरक्षित झाल्यामुळे त्यांना इतर वॉर्डांचा शोध घ्यावा लागणार आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक