वॉर्ड क्र. ५८, कैलासनगर, संजयनगरमध्ये सिमेंट रस्ते!
By Admin | Updated: July 17, 2014 01:36 IST2014-07-17T01:31:31+5:302014-07-17T01:36:30+5:30
औरंगाबाद : सर्वसामान्य नागरिकांच्या वसाहती असलेल्या कैलासनगर, संजयनगर भागातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती.

वॉर्ड क्र. ५८, कैलासनगर, संजयनगरमध्ये सिमेंट रस्ते!
औरंगाबाद : सर्वसामान्य नागरिकांच्या वसाहती असलेल्या कैलासनगर, संजयनगर भागातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. या वसाहतींमध्ये मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे दायित्व महापालिकेवर आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून मनपा चांगले गुळगुळीत रस्ते बांधून देत नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात बराच त्रास सहन करावा लागत होता. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी स्थानिक विकास निधीतून तब्बल चार सिमेंट रस्ते तयार केले. या रस्त्यांचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
दत्त मंदिर, गल्ली क्र. ५
कैलासनगरातील दत्त मंदिर, गल्ली क्र. ५ येथील रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था होती. नागरिकांनी अनेकदा मनपाकडे रस्ता पक्का बांधून द्यावा, अशी मागणी केली होती. दरवर्षी मनपा टाळाटाळ करीत असे.
या भागातील नागरिकांनी नगरसेवक आगा खान यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान, नागरिकांची अडचण लक्षात घेऊन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दत्त मंदिर येथील गल्ली सिमेंट रस्त्याने गुळगुळीत करण्याचा निर्णय घेतला. अल्पावधीत हे काम युद्धपातळीवर करण्यात आले. त्यामुळे नागरिक अत्यंत आनंदित आहेत.
दत्त मंदिर, गल्ली क्र. ६
कैलासनगरमधील दत्तमंदिर गल्ली क्र. ६ मध्येही परिस्थिती खूप समाधानकारक नव्हती. रस्ता अत्यंत खराब झाला होता. पावसाळ्यात तर नागरिकांना जीव मुठीत घेवून ये-जा करावी लागत होती. नागरिकांनी या भागातील रस्ता गुळगुळीत करून देण्याची विनंती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडे केली होती. नागरिकांच्या विनंतीला मान देऊन अल्पावधीत हा रस्ता तयार करण्यात आला. दत्त मंदिर परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगरसेवक आगा खान, अमानुल्ला खान पठाण आदींची उपस्थिती होती.
संजयनगर, हमजा मशीद
वॉर्ड क्र. ५४, संजयनगर भागातील हमजा मशीदसमोरील रस्त्याची अवस्थाही अत्यंत वाईट झाली होती. या भागातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी हा एकच प्रमुख रस्ता असल्याने बराच त्रास सहन करावा लागत होता. शालेय विद्यार्थी तर जीव मुठीत घेवूनच ये-जा करीत होते. परिसरातील नागरिकांनी अनेकदा रस्ता बांधून देण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान यांच्याकडे केली होती. मनपाच्या अर्थसंकल्पातून हे काम होत नसल्याने त्यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याकडे निधीतून काम करून देण्याची विनंती केली. अल्पावधीत हा रस्ता अत्यंत चांगला आणि दर्जेदार तयार करण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
संजयनगर, गल्ली क्र. बी-९
संजयनगर ही सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची वसाहत असून, या वसाहतीत मनपाकडून पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.
वॉर्डातील बहुतांश विकासकामे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा आणि खा. विजय दर्डा यांच्या विकास निधीतून करण्यात आली आहेत. या भागातील गल्ली क्र. बी-९ मधील रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था होती. राजेंद्र दर्डा यांच्या विकास निधीतून रस्ता बांधण्यात आला. या रस्त्याचे लोकार्पणही नुकतेच करण्यात आले. यावेळी माजी विरोधी पक्षनेता डॉ. जफर खान, शाकेर खान, अय्युब खान, शेख उस्मान, शेख रफिक, मकसूद खान, रशीद शेख, राजू शेख, राजू बागवान, मोहंमद नवाज, हकीम सहाब, हनीफ मामू, शेख महेबूब, शेख रहेमान, शेख नदीम, खादर खान, एजाज शेख, साजेद, अमजद शेख, शेख सर्फराज, समीर खान, अनवर खान, कलीम खान, शेख जुबैर, आमेर शेख, नूर खान, विठ्ठल जोशी, प्रमोद थोरात, शेख मुख्तार, जानीभाई आदी उपस्थित होते.
युसूफ खान, शेख रहीम, नसीर पठाण, नजीर पठाण, बाबर शेख, मखदूम खान पठाण, हिदायत पठाण, संदीप फुले, सुमन जाधव, सुमन बागूल, शेख नदीम, शेख नसीम, शेख रिजवान, शेख उस्मान, शेख मुख्तार, शेख अलीम आदींची उपस्थिती होती.