शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पाणीपुरवठ्यात सुधारणेसाठी वॉर रूम, खास पथके स्थापन; अर्धी महापालिका लागली कामाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 17:44 IST

प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडून व्यापक प्रमाणात उपाययोजना

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मंगळवारी अर्धी महापालिका कामाला लावण्याचा निर्णय घेतला. स्मार्ट सिटीत खास वॉर रूम स्थापन करण्यात येत असून, मनपाच्या ९ झोनसाठी पालक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले. वितरण व्यवस्था, व्हॉल्व्हमधून पाण्याची गळती रोखण्यासाठी स्वतंत्र पथक नेमले. विविध शासकीय कार्यालयांमधील ८ निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

मंगळवारी स्मार्ट सिटी कार्यालयात पाणीपुरवठ्याबाबत मनपा अधिकाऱ्यांसोबत पाण्डेय यांनी बैठक घेतली. बैठकीत ठोस निर्णय घेण्यात आले. शहराला चार भागात विभागण्यात आले. प्रत्येक विभागाला एक उपअभियंता देण्याचा निर्णय झाला. ढोरकीन पंप हाऊस येथे बूस्टर बसविण्यात येणार आहे. प्रत्येक पथकाला उपायुक्त संतोष टेंगळे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे मार्गदर्शन करतील. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत पाणीपुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन अधिकारी असतील.

पाणीपुरवठ्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले. पाण्याची गळती रोखण्यासाठी उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक काम करेल. जायकवाडी येथील पंपगृहातील पंपाच्या स्टेनरमध्ये गवत इ. मुळे चोकअप आहे का, याची तपासणी पाणबुड्यांमार्फत करून घेण्यात आली. जायकवाडी ते फारोळा या जलवाहिनीवर कर्मचाऱ्यामार्फत गस्त सुरू आहे. फारोळा येथील पंपाची रेट्रो फिटिंग व ढोरकीन येथे नवीन पंप बसविण्याचे काम सुरू आहे.

५ एमएलडी पाण्याची बचतगुंठेवारी भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. मनपाने नेमलेल्या कंत्राटदाराचे टँकर आता एन-१ येथील एमआयडीसीच्या केंद्रावरून टँकर भरत आहेत. त्यामुळे एन-५ आणि एन-७ येथील टाक्यांवरील किमान ५ एमएलडी पाण्याची बचत होत आहे.

‘एसटीपी’च्या पाण्याचा वापरबांधकामासाठी पूर्वी मनपाकडून पाणी देण्यात येत नव्हते. ज्यांना बांधकामासाठी पाणी हवे असेल, त्यांना नक्षत्रवाडी येथील मल -जल प्रक्रिया केंद्रातील शुद्ध केलेले पाणी देण्यात येईल. मनपाचे सेवानिवृत्त अधिकारी अफसर सिद्दिकी यांच्या मार्गदर्शनाखाली सीवेज ट्रीटमेंट प्लांटच्या पाण्याचा उपयोग होत आहे.

संवेदनशील पाण्याच्या टाक्याशिवाजीनगर, सूतगिरणी, पुंडलिकनगर, ज्युबिली पार्क व वेदांतनगर येथील पाण्याच्या टाक्या संवेदनशील आहेत. या ठिकाणी अनेकदा आंदोलने होतात. या ठिकाणी माजी सैनिक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाई