शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

रांजणगावच्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 21:16 IST

अग्नीशमन कर्मचाऱ्यांनी रात्री चौघांना बाहेर काढले.

मेहमूद शेख

वाळूज महानगर: तलावात पोहण्यासाठी गेलेल्या रांजणगावच्या चार शाळकरी मुलांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची ह्दयद्रावक घटना आज गुरुवारी सांयकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. मयतात दोन सख्खे भाऊ असून ते दोघा मित्रासोबत तलावात पोहण्यासाठी गेले होते. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास या चौघांना अग्नीशमनदलाच्या कर्मचा-यांनी बाहेर काढले.

रांजणगावातील जावेद शेख यांची अफरोज शेख (१४), अबरार शेख (१२) ही दोन मुले आपले मित्र बिश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय व अन्य एकासोबत गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घराबाहेर खेळण्यासाठी गेले होते. सांयकाळी ५ वाजले तरी मुले घरी न आल्याने जावेद शेख हे आपल्या इतर नातेवाईकांना सोबत घेऊन आपल्या मुलांचा परिसरात सर्वत्र शोध घेत होते. ही शोध मोहिम सुरु असतांना रांजणगावच्या बनकरवाडीलगत असलेल्या पाझर तलावाजवळ जावेद शेख व त्यांचे नातेवाईक मुलांना शोधत होते. तलावालगत अफरोज, अबरार तसेच इतर दोन मुलांचे कपडे दिसून आल्याने जावेद शेख यांना मुले तलावात बुडाल्याचा संशय आल्याने त्यांनी हंबरडा फोडला. यावेळी जावेद शेख यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांनी या घटनेची माहिती वाळूज अग्नीशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस व गावात दिली.

अग्नीशमन कर्मचा-यांनी रात्री चौघांना बाहेर काढलेरांजणगावच्या तलावात चार शाळकरी मुले बुडाल्याची माहिती वा-यासारखी वाळूज उद्योगनगरीत पसरल्याने शेकडो जणांनी तलावाच्या ठिकाणी गर्दी केली होती. यावेळी वाळूज अग्नीशमन दलाचे पी.के.चौधरी, के.टी.सुर्यवंशी, पी.के.हजारे, एन.एस.कुमावत, एस.बी.महाले, वाय.डी.काळे, एस.बी.शेंडगे यांनी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास नागरिकांच्या मदतीने अफरोज शेख अबरार शेख, बिश्वजीतकुमार व अन्य एक अशा चार मुलांना बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, गणेश ताठे, उपनिरीक्षक पुंडलीक डाके, शिवाजी घोडपडे, पोकॉ. योगेश शळके आदींनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने या चार जणांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतुन शासकीय रुग्णालयात रवाना केले.

रांजणगावात पसरली शोककळागावातील पाझर तलावात चार शाळकरी मुले बुडाल्याची माहिती वा-यासारखी रांजणगावात पसरली होती. यावेळी प्रभाकर महालकर, दत्तु हिवाळे, दीपक बडे, जावेद शेख, साईनाथ जाधव, दीपक सदावर्ते आदींनी तलावातुन मुलांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू