शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज महानगर हादरले; वडगाव कोल्हाटी मार्गावर गोळ्या घालून तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 11:40 IST

वाळूज महाननगरात आठ दिवसांत दुसरा खून, उद्योगनगरी हादरली

- संतोष उगलेवाळूज महानगर : एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या तिसगाव-वडगाव मार्गावर साईबाबा चौकात गोळी झाडून एकाची हत्या केल्याची घटना कचरा टाकण्यासाठी आलेल्या महिलांच्या शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. घटनेची माहिती सरपंच सुनील काळे यांनी पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खून झालेल्या तरुणाचे नाव कपिल पिंगळे (रा. रांजणगाव) असे आहे.

शुक्रवारी पहाटे साईनगर सिडको येथील महिला कचरा टाकण्यासाठी तिसगाव - वडगाव मार्गावरील साईबाबा चौकात गेल्या असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला तरुण दिसला. घाबरलेल्या महिलांनी घरी येऊन हा प्रकार पतीच्या कानावर टाकला. क्षणात घटनेची माहिती परिसरात पसरली. पुढे  माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोनि कृष्णा शिंदे, फौजदार संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार विकास वैष्णव, विशेष शाखेचे योगेश शेळके, विक्रम वाघ, राजेभाऊ कोल्हे, बाळासाहेब आंधळे, डिबी पथकाचे विनोद नितनवरे, फौजदार मनोज शिंदे आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी एक गावठी कट्टा आणि गोळी झाडल्यानंतर रिकामे राहिलेले एक काडतूस पोलिसांना आढळून आले.

मृत तरुणांची पोलिसांनी ओळख पटवली असता त्याचे नाव कपिल पिंगळे असून तो रांजणगावात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खात्री करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ  त्याच्या नातेवाईकांची संपर्क साधला. कपिलच्या वडिलांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता तो आपलाच मुलगा कपिल असल्याचे सांगितले. काही वेळातच घटनास्थळी दाखल झालेल्या मृताच्या आईने एकच टाहो फोडला. आक्रोश करत कपिलच्या मारेकऱ्याचा तत्काळ शोध लावावा अशी मागणी केली.

खुनाचे कारण अस्पष्ट कपिल पिंगळेच्या छातीत गोळ्या घालून आरोपीने गावठी कट्टा जागीच सोडून घटना स्थळावरून पळ काढला. अद्याप कुणाचे कारण स्पष्ट झाले नसून आरोपी ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.

घटनास्थळी शेकडो मित्रांचा गोतावळा कपिलचा मित्रपरिवार दांडगा होता. त्याचा खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी वाळूज औद्योगिक परिसरात पसरली माहिती मिळताच त्याचा मित्रांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली होती. लोकांची गर्दी आणि कपिलचे मित्र यांना  दूर करण्यासाठी पोलिसांना चांगलेच प्रयत्न करावे लागले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी