नाला सरळीकरणाच्या कामात बर्दापूरमध्ये ‘वाकडे’ पाऊल
By Admin | Updated: November 29, 2015 23:18 IST2015-11-29T22:42:00+5:302015-11-29T23:18:59+5:30
व्यंकटेश वैष्णव , बीड अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे रोजगार हमी योजने अंतर्गत नाला सरळीकरण व खोलीकरणासह रस्त्याचे काम झाले आहे. सदरील चौकशी करण्यासाठी पथक आले

नाला सरळीकरणाच्या कामात बर्दापूरमध्ये ‘वाकडे’ पाऊल
व्यंकटेश वैष्णव , बीड
अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे रोजगार हमी योजने अंतर्गत नाला सरळीकरण व खोलीकरणासह रस्त्याचे काम झाले आहे. सदरील चौकशी करण्यासाठी पथक आले असता संबंधीत ठेकेदारांपासून ते ग्रामरोजगार सेवक यांनी देखील दांडी मारली. पथकाला पुरेशी माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली असल्याचे चौकशी समितीतील एका अधिकाऱ्याने सांगितले.
बर्दापूर येथील मजूरांना दुष्काळी स्थितीत रोजगार मिळावा या उद्देशाने नाला सरळीकरण व खोलीकरणाचे काम रोहयो अंतर्गत हाती घेण्यात आले होते. मात्र होत असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्याने बर्दापूर हे गाव चौकशीच्या फेऱ्यात आले. यानुसार एक पथक चौकशीसाठी नेमण्यात आले. पथक चौकशीसाठी गावात आले.
मात्र, काम करणारे व करून घेणारे शिवाय मजूर कोणीच उपस्थित नसल्याने पथकाला अर्धवट माहिती घेवून परतावे लागले. हे पहिल्यांदा घडल्या नंतर पुन्हा दुसऱ्यावेळी देखील पथकाला चौकशीसाठी संबंधीतांनी सहकार्य केले नाही. याबाबतचा अहवाल देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिलेला आहे. पुढील कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.