घाटीत फिरणारा तोतया डॉक्टर पकडला
By Admin | Updated: September 4, 2014 00:53 IST2014-09-04T00:48:21+5:302014-09-04T00:53:36+5:30
औरंगाबाद : डॉक्टर असल्याचे सांगून विविध वॉर्डांतील रुग्णांशी संवाद साधणाऱ्या तरुणास रुग्णाच्या नातेवाईकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.

घाटीत फिरणारा तोतया डॉक्टर पकडला
औरंगाबाद : डॉक्टर असल्याचे सांगून विविध वॉर्डांतील रुग्णांशी संवाद साधणाऱ्या तरुणास रुग्णाच्या नातेवाईकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घाटी रुग्णालयात घडली.
प्रकाश प्रल्हाद वानखेडे (रा.बेगमपुरा)असे पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. घाटीचे प्रभारी वैैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश मगरे यांनी सांगितले की, प्रकाश हा घाटीच्या विविध वॉर्डांत फिरून रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टर असल्याचे सांगतोे, तसेच तुमच्यावरील उपचार मोफत करून देतो, असे सांगून तो रुग्णांच्या नातवाईकांकडून पैैसे उकळतो. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी त्याच्याविरोधात यापूर्वी आलेल्या आहेत, तसेच निवासी वैैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे सांगून तो रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैैसे उकळतो. निवासी वैैद्यकीय अधिकारी डॉ. हिना खान यांनी त्याला यापूर्वी पकडले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून तो पुन्हा विविध वॉर्डांत फिरत असतो. मदत करीत असल्याचे दाखवून तो आपला उद्देश साध्य करतो. आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नेत्ररोग विभागाच्या वॉर्डात तो एका रुग्णाच्या लहान बालिकेजवळ जाऊन तिच्याशी बोलू लागला. तिच्या नातेवाईकांनी त्यास हटकताच तो तेथून दुसऱ्या रुग्णाशी संवाद साधू लागला. ओळख नसताना हा माणूस विनाकारण संवाद साधत असल्याचे त्या महिलेने नातेवाईकांस सांगितले, तेव्हा त्यांनी त्यास पकडून चांगलाच चोप दिला आणि मेडिकल पोलीस चौकीत नेले. तेथून त्यास वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयात नेण्यात आले. वैैद्यकीय अधीक्षक डॉ. मगरे यांनी ही घटना बेगमपुरा पोलीस ठाण्याला कळवली. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
चार वर्षांपूर्वी त्याच्यावर घाटीत एक आॅपरेशन झाले, तेव्हा तो दोन ते तीन महिने अॅडमिट होता. यावेळी त्याने प्रत्येक वॉर्डातील कामकाजाचा बारकाईने अभ्यास केला. डॉक्टरांचा राऊं ड केव्हा होतो हे त्यास चांगले माहीत आहे. रुग्णांना गोड बोलले की, त्यांचा विश्वास सहज संपादन करता येतो, हे त्याने चांगलेच हेरले आहे.