‘ती’ जागा वक्फ बोर्डाचीच

By Admin | Updated: August 13, 2014 01:41 IST2014-08-13T01:10:10+5:302014-08-13T01:41:02+5:30

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे चंपाचौक ते जालना रोडपर्यंत रस्ता होईल, अशी चिन्हे नसताना मनपाने जमीन मालक मे. मुळे ब्रदर्स यांना रस्ता करण्यापूर्वीच मोबदला देण्याचा घाट घातला होता

The 'Wakf' board is in place | ‘ती’ जागा वक्फ बोर्डाचीच

‘ती’ जागा वक्फ बोर्डाचीच

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे चंपाचौक ते जालना रोडपर्यंत रस्ता होईल, अशी चिन्हे नसताना मनपाने जमीन मालक मे. मुळे ब्रदर्स यांना रस्ता करण्यापूर्वीच मोबदला देण्याचा घाट घातला होता. तो प्रस्ताव स्थगित ठेवल्याचे नगररचना विभागाने सभापतींना पत्रही दिले आहे; परंतु ती जागा वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचा दावा करणारे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद एजाज हुसैन यांनी मनपा आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांना दि.११ आॅगस्ट रोजी दिले आहे.
मे.मुळे ब्रदर्स यांना अनधिकृतपणे भूसंपादनाची रक्कम अथवा टीडीआर देण्यात येऊ नये. कारण सीटीएस नं. १२८७८ मधील जागा वक्फच्या मालकीची आहे. ११ मे २०१२ च्या सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ घेऊन वक्फच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मनपाला पत्र दिले
आहे. तो रस्ता होण्यासाठी तीन वसाहतींमधील अंदाजे ८०० घरे बाधित होतात. त्या मालमत्ता ताब्यात घेणे सध्या शक्य नसताना पालिकेने एका जागेसाठी चुकीचा पायंडा पाडणारा प्रस्ताव १९ जुलैच्या स्थायी समितीसमोर ठेवला होता.
गेल्या महिन्यातील स्थायी समितीसमोर भूसंपादन आणि बांधकाम परवानगी, असे दोन विषय एकत्रित करणारा गुंतागुंतीचा प्रस्ताव नगररचना विभागाने आणला होता. या प्रस्तावामुळे नगररचना विभागाचे दीड कोटी रुपयांचे रोख उत्पन्न बुडणार होतेच, भूसंपाद करावी लागणारी जागा कुणाच्या मालकीची आहे, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
काय होते प्रस्तावात
सहायक संचालक नगररचना यांनी प्रस्तावात तीन मुद्दे मांडून भूसंपादन आणि मोबदला देण्याचे ठरविले होते; परंतु तक्र ारी आल्यामुळे संबंधित प्रस्तावाचे पुन:निरीक्षण करावे लागणार असल्याचे सहायक संचालक नगररचना यांनी एका पत्रात नमूद केले.
याचा अर्थ तो प्रस्तावच चुकीचा होता, असा होतो. मोंढानाका जालना रोड येथील सीटीएस नं. १२८७८ वर २००१ च्या विकास आराखड्यानुसार आरक्षण क्रमांक २१८,२१९ हे वाहनतळ व दुकान केंद्रासाठी आहे.
एकूण जागेतील २०३५ चौ. मी. क्षेत्र बाधित होत असून, ते आरक्षण ४५ व ३० मीटर रुंद विकास रस्त्यासाठी आले आहे. ती जागा मे. मुळे ब्रदर्स यांची आहे. ती एका बिल्डरला विकसित करण्यासाठी दिलेली आहे. मात्र आता वक्फ बोर्डानेही जागेच्या मालकीबाबत दावा केला आहे.

Web Title: The 'Wakf' board is in place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.