शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

खाटा रिकाम्या होण्याची रुग्णांची प्रतीक्षा; कोविड केअर सेंटर परिसरात कोरोनाबाधितांची रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 17:48 IST

rapid growth of corona patients in Aurangabad वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येसमोर बेडही अपुरे पडत आहेत. परिणामी कोविड सेंटरवर रुग्णांच्या रांगा लागत आहेत.

ठळक मुद्देरुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचा परिणामदाखल रुग्ण बाहेर पडला की रिकाम्या खाटेवर वर्णी लागावी यासाठी प्रयत्न

औरंगाबाद : कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सक्रिय रुग्णसंख्या आठ हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे उपलब्ध आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याने आता रुग्णांना खाटा रिकाम्या होईपर्यंत प्रतीक्षा करण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. मनपाचे कोविड सेंटर, घाटीसह जिल्हा रुग्णालय परिसरात शुक्रवारी रुग्ण खाटा मिळण्याच्या प्रतीक्षेत ताटकळत बसले होते, तर लक्षणे नसलेले रुग्णही भीतीपोटी भरती करण्याचा आग्रह करतानाचे चित्र पाहायला मिळाले.

वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येसमोर बेडही अपुरे पडत आहेत. परिणामी कोविड सेंटरवर रुग्णांच्या रांगा लागत आहेत. दाखल रुग्ण बाहेर पडला की रिकाम्या खाटेवर वर्णी लागावी, यासाठी रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये रांगा लावत आहेत. तपासणीनंतर रिपोर्ट आल्यावर उपलब्ध बेड असलेल्या कोविड केअर सेंटरवर संदर्भित करण्यात येते. मात्र, तिथे उशीर लागला किंवा सोयीच्या केंद्रावर जागा मिळावी, यासाठी बाधित रुग्ण कोविड केअर सेंटर, जिल्हा रुग्णालय, घाटी परिसरात ठाण मांडून असल्याची सद्यस्थिती आहे. घाटी रुग्णालयात अपघात विभागात भरती करून नंतर मेडिसिन किंवा सुपरस्पेशालिटी ब्लाॅकमध्ये जागा उपलब्ध होईपर्यंत चार तासांहून अधिक वेळ ताटकळावे लागत आहे. मनपा, घाटीकडून खाटा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, लक्षणे नसलेल्या रुग्णांकडूनही भरती करून घेण्यासाठी आग्रह होत असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर प्राधान्यक्रमाचे आव्हान निर्माण झाले आहे.

लक्षणे नसणाऱ्यांनी भरतीचा आग्रह करू नयेहोम आयसोलेशनची सुविधाही सुरू केली आहे. ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत. सहविकृती, आजार नाही, अशा रुग्णांना नंतर बेड मिळणार नाही, या भीतीपोटी भरती होण्याचा आग्रह करू नये. अशा रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारावा, घरी उपचार घ्यावे. काही अडचण असेल तर कोविड केअर सेंटरवर दाखवावे. मात्र, ऑक्सिजनची गरज, लक्षणे किंवा देखरेखीखाली उपचार घेण्याची गरज असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरवर प्राधान्य मिळावे. त्यांची भरती व्हावी.-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद