शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'अतिवृष्टीग्रस्तांना भरपाईची प्रतीक्षाच'; प्रशासन आणि जिल्हा बँकेच्या विसंगत भूमिकेचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 19:45 IST

जिल्हा बँकेच्या संचालकांनी आम्हाला धनादेशाद्वारे रक्कम न देता खात्यावर थेट आरटीजीएस करा ही भुमीका घेऊन धनादेश न स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

- श्रीकांत पोफळेकरमाड (औरंगाबाद ) : खरिप हंगामाची सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्ठीची नुकसान भरपाई खात्यावर जमा होण्याची शेतकरी दिवाळीच्या पूर्वीपासून प्रतीक्षेत आहे. जिल्हा बँक व जिल्हा प्रशासन यांच्या आपसातील विसंगत भूमिकेमुळे औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळायला उशीर होत असल्याचे चित्र आहे. यामुळे औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार. 

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे शासनाच्यावतीने सांगण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद तहसील मार्फत जिल्हा बँकेला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी व धनादेश देखील देण्यात आले होते. मात्र जिल्हा बँकेच्या संचालकांनी आम्हाला धनादेशाद्वारे रक्कम न देता खात्यावर थेट आरटीजीएस करा ही भुमीका घेऊन धनादेश न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे धनादेश पुन्हा तहसील कार्यालयात पाठवण्यात आले. कारण सोयगाव व फुलंब्री तालुक्याला पैसे आरटीजीएस द्वारे दिल्या गेले. तहसीलदार ज्योती पवार यांनी जिल्हाधिकारी यांना धनादेश परत मिळाल्यासंदर्भात कल्पना दिली. त्याची जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेत. बैठकीमध्ये जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक आर.आर. शिंदे यांना हे धनादेश स्वीकारून मदत तात्काळ पोहोचविण्यास संदर्भात पावले उचलण्याचे आदेश दिले. त्यानंतर तहसीलमार्फत पुन्हा हे धनादेश व त्यासोबत शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेला पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली. या सर्व प्रक्रियेमुळे व जिल्हा बँक व जिल्हा प्रशासन यांच्या विसंगत भूमिकेमुळे औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी तर सोडा दिवाळीनंतर जवळपास आठवडा उलटत आला तरी देखील मिळालेली नसल्याने बळीराजा हवालदिलं झाला आहे.

लवकर मदत देण्यासाठी 'आरटीजीएस'चा आग्रहतहसीलमार्फत आम्हाला एसबीआयचा धनादेश दिला हा धनादेश वटण्यासाठी किमान चार दिवस लागणार होते. शेतकऱ्यांना मोबदला दिवाळीपूर्वी देण्याची आम्ही संपूर्ण तयारी केली होती. जर जिल्हा बँकेने आरटीजीएसद्वारे पैसे दिले असते तर आम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी पैसे जमा करता आले असते. याच भूमिकेतून आम्ही धनादेश परत करून आरटीजीएसचा असा आग्रह केला. सोयगाव व फुलंब्री तालुक्याला यांनी आरटीजीएस द्वारे पैसे पाठवलेले आहेत.- जावेद पटेल , संचालक, जिल्हा बँक

धनादेश आणि याद्या दिल्या नुकसान भरपाईचा मोबदला देण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची यादी व धनादेश यापूर्वीही देत आलो. त्याच पद्धतीने आम्ही जिल्हा बँकेत धनादेश व याद्या पाठवल्या होत्या. मात्र जिल्हा बँकेने या याद्या व धनादेश परत केल्या. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर पुन्हा या याद्या व धनादेश जिल्हा बँकेने स्वीकारण्याचा निर्णय घेतला.- जोती पवार,​ तहसीलदार, औरंगाबाद

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद