घाटीत श्वासासाठी शिशूंची ‘वेटिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:04 IST2017-10-06T01:04:45+5:302017-10-06T01:04:45+5:30
गोरगरीब रुग्णांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या घाटी रुग्णालयातील बालरोग विभाग सध्या व्हेंटिलेटरवरच आहे.

घाटीत श्वासासाठी शिशूंची ‘वेटिंग’
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गोरगरीब रुग्णांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या घाटी रुग्णालयातील बालरोग विभाग सध्या व्हेंटिलेटरवरच आहे. या विभागात महिन्याला नऊशे ते हजार बालके दाखल होतात. परंतु येथे अवघे चार व्हेंटिलेटर आहेत. त्यामुळे श्वास घेण्याची प्रतीक्षा नवजात शिशूंच्या जिवावर बेतत आहे.
घाटीत बुधवारी व्हेंटिलेटरअभावी नवजात शिशूचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केल्याने खळबळ उडाली. अनेक शहरांप्रमाणे औरंगाबादेतही घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. प्रसूतीनंतर अनेक कारणांमुळे नवजात शिशुला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते.